पाच बोटी स्फोटाने उडविल्या

By admin | Published: April 15, 2015 01:54 AM2015-04-15T01:54:34+5:302015-04-15T01:54:34+5:30

भीमा नदीपात्रात अनधिकृतपणे वाळूउपसा करणाऱ्या बोटी स्फोट करून फोडण्याची कारवाई मंगळवारी दुपारपासून महसूल विभागाने सुरू केली आहे.

Five boats blasted | पाच बोटी स्फोटाने उडविल्या

पाच बोटी स्फोटाने उडविल्या

Next

कर्जत (जि. अहमदनगर) : भीमा नदीपात्रात अनधिकृतपणे वाळूउपसा करणाऱ्या बोटी स्फोट करून फोडण्याची कारवाई मंगळवारी दुपारपासून महसूल विभागाने सुरू केली आहे. आतापर्यंत पाच बोटी स्फोट करून उडवून देण्यात आल्या आहेत.
माळढोक आरक्षणामुळे कर्जत तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीपात्रातील वाळूचे लिलाव होत
नाहीत, तर पुणे जिल्हा हद्दीतील गावांच्या भीमा नदीपात्रातील लिलाव होतात.
येथे वाळूउपसा करणारे सर्व वाळूतस्कर तिरापलीकडील भागात आहेत. लिलाव त्यांच्या हद्दीतील घ्यायचा व वाळूउपसा कर्जतच्या हद्दीतील करायचा हा त्यांचा नित्यक्रम बनला आहे.
कारवाई केली की एक-दोन दिवस हा प्रकार बंद असतो; नंतर
मात्र बेकायदा वाळूउपसा सुरू होतो. या प्रकाराला वैतागून मंगळवारी
दुपारी कर्जतचे तहसीलदार
जयसिंग भैसडे यांनी पोलीस बंदोबस्तात बोटी फोडण्याची
कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Five boats blasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.