पाच बोगस डॉक्टरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 04:26 AM2020-01-11T04:26:27+5:302020-01-11T04:26:31+5:30
दुर्धर आजार बरे करण्याच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना शुक्रवारी अटक करण्यात आली.
मुंबई : दुर्धर आजार बरे करण्याच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना शुक्रवारी अटक करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९, ११ आणि १२ ने ही कारवाई केली.
स्वप्नकुमार मंडल (४९), रामकुमार मिश्रा (५२), शोएब आघारीय (३२), तुकाराम थोरात (५२) आणि शेख अझीझ (४२) अशी पाच जणांची नावे आहेत. कक्ष ९ चे प्रमुख महेश देसाई, कक्ष ११ चे चिमाजी आढाव, १२ चे प्रमुख सागर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, शरद दराडे आणि वाल्मिकी कोरे यांची पथके तयार केली.त्यांनी जुहू, वर्सोवा, विलेपार्ले आणि मालाडच्या मालवणी परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. या सर्वांकडून विविध औषधे तसेच उपचाराची साधने हस्तगत करण्यात आली.