वीस वर्षांत पाच नगरसेवकांची हत्या
By Admin | Published: March 23, 2015 12:38 AM2015-03-23T00:38:57+5:302015-03-23T00:38:57+5:30
महानगरपालिकेच्या दोन दशकाच्या वाटचालीमध्ये ५ नगरसेवकांची हत्या झाली आहे. काही नगरसेवकांच्या हत्येचा कट फसला आहे.
नामदेव मोरे - नवी मुंबई
महानगरपालिकेच्या दोन दशकाच्या वाटचालीमध्ये ५ नगरसेवकांची हत्या झाली आहे. काही नगरसेवकांच्या हत्येचा कट फसला आहे. लोकप्रतिनिधींच्या हत्येच्या घटना राज्यभर गाजल्या असून अनेक नगरसेवकांना पोलिस सुरक्षेमध्ये वावरावे लागत आहे.
नगरसेवकाला सामाजिक प्रतिष्ठा असली तरी याच पदामुळे वैमनस्यामध्येही वाढ होत असते. राजकीय स्पर्धेमधून अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. काही नगरसेवकांवरही खुन व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम १४ गाव विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनंता भोईर यांची हत्या झाली. यानंतर ऐरोलीमधील नगरसेवक पप्पू उर्फ प्रदिप सावंत यांची हत्या झाली. याच परिसरामधील नगरसेविका मीना मोरे यांच्या हत्येची घटना राज्यभर गाजली व लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे निदर्शनास आले.
ऐरोलीमधील नगरसेवक देविदास चौगुले यांची २००७ मध्ये दिवाळीमध्ये हत्या झाली. या प्रकरणामधील आरोपींना पोलिसांनी अटक केली परंतू नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. याच दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक आनंद काळे यांची भरदिवसा गोळया झाडून हत्या करण्यात आली. आतापर्यंत ५ नगरसेवकांची हत्या झाली असून त्यामधील ४ जण ऐरोली व दिघा परिसरातील रहिवासी आहेत. नगरसेवक सुरक्षीत नसतील तर सर्वसामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगरसेवकांबरोबर अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या खुनाच्या घटनाही गाजल्या विलास जाधव खुनप्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विश्वास पाटील यांच्या खुनाचे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. नितीन प्रभू, राकेश म्हात्रे व इतर अनेक कार्यकर्त्यांच्या खुनाच्या घटना गाजल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे घणसोलीमधील नगरसेवक संजय पाटील (अंकल) यांच्यावरही खुनी हल्ला झाला होता. रिव्हॉल्वरचालली नसल्याने ते वाचले. यापूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावरही गोळीबार झाला होता. ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्यावरही हल्ला झाला होता.
नगरसेवकाला सामाजिक प्रतिष्ठा असली तरी याच पदामुळे वैमनस्यामध्येही वाढ होत असते. राजकीय स्पर्धेमधून अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. काही नगरसेवकांवरही खुन व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. नगरसेवकांबरोबर अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या खुनाच्या घटनाही गाजल्या आहेत. त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षणामध्ये रहावे लागत आहे.
हत्या झालेल्या नगरसेवकांची नावे
च्अनंता भोईर
च्पप्पू उर्फ प्रदीप सावंत
च्मीना मोरे
च्देविदास चौगुले
च्अनंत काळे