‘एमआरआय’ दुरुस्तीसाठी पाच कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:48 AM2018-04-12T02:48:02+5:302018-04-12T02:48:02+5:30
नायर रुग्णालयातील एमआरआय मशिनमध्ये अडकून रुग्णाचे नातेवाईक राजेश मारू यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही मशिन नादुरुस्त झाली आहे. या मशिनच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये खर्च असल्याचा प्रस्ताव खाजगी कंपनीने दिला आहे.
मुंबई: नायर रुग्णालयातील एमआरआय मशिनमध्ये अडकून रुग्णाचे नातेवाईक राजेश मारू यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही मशिन नादुरुस्त झाली आहे. या मशिनच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये खर्च असल्याचा प्रस्ताव खाजगी कंपनीने दिला आहे. नायर रुग्णालयात मशिनीची देखरेख करणाऱ्या कर्मचाºयांचा अभाव असल्याने ही मशिन इतके दिवस नादुरुस्त राहिली. नायर रुग्णालय प्रशासन मारू यांच्या मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीत आज केला.
या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. मात्र सहा महिन्यांनंतर हे प्रकरण थंडावले. ही घटना दाबण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून होत आहे. मारू यांच्या मृत्यूनंतर नायर रुग्णालयातील परिस्थिती बदलेल असे वाटले होते. मात्र आजही निष्काळजीपणा दिसून येतो.
नायर रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे एमआरआय मशिन दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च खाजगी कंपनीने सांगितला आहे. यास रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप शेख यांनी केला. मात्र मशिन दुरुस्तीच्या प्रस्तावाला या चर्चेनंतर स्थायी समितीने मंजुरी दिली.