Join us

पाच दिवसाच्या बाप्पाला भावपुर्ण निरोप

By admin | Published: September 02, 2014 11:52 PM

सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक 86 तर खाजगी 438 गणोशमुत्र्याचे विसर्जन मंगळवारी करण्यात आले.

पालघर :  सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक 86 तर खाजगी 438 गणोशमुत्र्याचे विसर्जन मंगळवारी करण्यात आले. पालघरमध्ये गणोशकुंडात तर सातपाटीमध्ये समुद्रात बाप्पाचे विसर्जन जल्लोषात करण्यात आले. यावेळी पालघर पोलीस कॉलनीमधील गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी अधिकारी, कर्मचा:यांसह महिलांनीही पारंपारीक वेशभुषेत गणपतीबाप्पाला निरोप दिला.
पोलीस म्हटला की बंदोबस्त, चो:या, दरोडे यांचा तपास इ. सह कायदा सुव्यवस्था अबाधीत रहाण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत यामुळे तो नेहमी 24 तास सक्रिय राहतो. परंतु आज पालघर पोलीस स्टेशनचे पो. नि. निलेश माईनकर यांनी आपल्या सहका:यांसह पारंपारीक वेशभुषेत पोलीस कॉलनीतील गणपती विसर्जन सोहळ्यात सहभाग घेऊन सर्वाना आनंद उपभोगण्याची संधी उपलब्ध करून दिली. ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत सर्वानी मोठय़ा उत्साहात आपल्या गणरायाचे विसर्जन केले.
पारोळ : पाच दिवसांच्या गणरायाला भक्तांनी भावपुर्ण अo्रुंनी निरोप दिला. बाप्पाला निरोप देण्यासाठी लहान थोरांची विसर्जनस्थळी गर्दी झाली होती.
गणरायाचा पाच दिवसाचा पाहुणचार केल्यानंतर अनेक भक्तांचे बाप्पाला निरोप देताना अंतकरण जड झाले होते. देव घरी आल्यामुळे जे घरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. अनेकांनी घरातील वाद मिटवून सर्वानी एकत्र येऊन गणरायाची आरती केली. घराला मंदिराचे रूप देणारा गणराया हे एकच दैवत आहे. म्हणून लाडक्या गणरायाचे विसर्जन करताना भक्तांचे डोळे पाणावले होते.
 
वसई : वसई-विरार भागात पाच दिवसाच्या गणपतीचे शांततेत विसर्जन झाले. महानगरपालिकेने यंदा आपल्या हद्दीतील अनेक तलावावर विसर्जनाची चोख व्यवस्था केली होती. स्थानिक पोलीसांनीही यंदा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी उशीरार्पयत वसई विरार मध्ये सुमारे चार हजार घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
 धुमधडाक्यात आगमन झालेल्या पाच दिवसाच्या गणपतीच्या दुपारनंतर विसर्जनाला सुरूवात झाली. अनेक कुटूंबिय आपले घरगुती गणपती दुपारी 2 नंतर विसर्जनस्थळी आणू लागले. महानगरपालिका प्रशासनाने यंदा विसर्जनासाठी जलरक्षक नियुक्त केले होते. तसेच तलावात तराफे निर्माण केले होते. विसर्जनस्थळी गणपती आणल्यानंतर जलरक्षक मुर्ती तराफ्यावर ठेवून तलावाच्या मध्यभागी विसर्जन करीत होते.