युतीच्या चर्चेचे गु-हाळ चालणार पाच दिवस
By admin | Published: January 16, 2017 08:05 PM2017-01-16T20:05:03+5:302017-01-16T22:16:21+5:30
मुंबई महापालिका निवडणूकीमध्ये शिवसेना-भाजपाच्या जागावाटपाचे प्रस्ताव इकडून-तिकडे गेले असले तरी युतीचा अंतिम निर्णय झाला नाही
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - मुंबई महापालिका निवडणूकीमध्ये शिवसेना-भाजपाच्या जागावाटपाचे प्रस्ताव इकडून-तिकडे गेले असले तरी युतीचा अंतिम निर्णय झाला नाही. मुंबई महानगरपालिकांच्या जागावाटपासाठी झालेली बैठक दीड तासापेक्षा अधिक वेळ झाली. पण सेना-भाजपामध्ये झालेली ही चर्चा प्राथमिक स्वरुपाची होती. बी 7 या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष अशिष शेलार म्हणाले, आजची बैठक फक्त मुंबई महानगरपालिकेच्या युतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी होती. राज्यातील इतर निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल. शिवसेनेबरोबर झालेल्या चर्चेत जागावाटपाबाबत प्रथमिक चर्चा झाली. 21 जानेवारी पर्यंत युतीचा निर्णय घेण्याची डेडलाईन आहे.
भाजपाच्या पहिल्या बैठकीत प्राथमिक स्वरुपाची बोलणी झाली, काही मुद्द्यांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री चर्चा करतील असे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.
आज झालेल्या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब, रविंद्र मिर्लेकर आणि अनिल देसाई उपस्थित आहेत. तर भाजपाकडून आशिष शेलार आणि विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि प्रकाश मेहता उपस्थित आहेत.