दिवाळीत गर्दी नियोजनासाठी पाच एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 06:58 AM2018-11-08T06:58:14+5:302018-11-08T06:58:26+5:30
दिवाळीतील वाढत्या गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरसह मुंबई-पटना मार्गावर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १० ते १३ नोव्हेंबर दरम्या या विशेष एक्स्प्रेस धावतील.
मुंबई - दिवाळीतील वाढत्या गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरसह मुंबई-पटना मार्गावर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १० ते १३ नोव्हेंबर दरम्या या विशेष एक्स्प्रेस धावतील.
ट्रेन क्रमांक ०१२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी अजनीसाठी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता अजनी येथे पोहचेल. विशेष एक्स्प्रेसमध्ये ११ शयनयान बोगींसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी बोगी आणि २ एसी-३ टियर बोगींचा समावेश आहे. ट्रेन क्रमांक ०१२०२ अजनी-मुंबई विशेष एक्स्प्रेस १२ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसºया दिवशी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल.
मुंबई-अलाहाबाद मार्गावर ट्रेन क्रमांक ०१०५५ विशेष एक्स्प्रेस १२ आणि १३ नोव्हेंबरला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ती दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरीमार्गे धावेल. १४ शयनयान बोगींसह एक्स्प्रेसमध्ये ४ सामान्य द्वितीय श्रेणी बोगी, २ वातानुकूलित बोगी आहेत. याशिवाय मुंबई-पटना मार्गावर ट्रेन क्रमांक ०२१३७ सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणार असून दादर, कल्याण, इगतपूरी, मनमाड मार्गे ती मार्गस्थ होईल.