Join us  

पाचशे मिडी ‘बेस्ट’ बसगाड्यांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:42 AM

प्रवासी भाड्यात कपात केल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने बेस्ट उपक्रमही आपला ताफा वाढविणार आहे.

मुंबई : प्रवासी भाड्यात कपात केल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने बेस्ट उपक्रमही आपला ताफा वाढविणार आहे. आता मिनी आणि मिडी बसगाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ५०० मिनी बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव सोमवारी मंजूर झाला. त्यानंतर आणखी पाचशे मिडी बसगाड्या घेण्यास बेस्ट समितीने मंगळवारी हिरवा कंदिल दाखविला.बेस्ट उपक्रमातील बसगाड्यांचा ताफा सात हजारपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सध्या ३२०० बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात आहेत. तीन महिन्यांत बेस्टचा ताफा सात हजारवर नेण्याची अट महापालिकेने घातली आहे. मात्र भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या या बसगाड्यांचा प्रस्ताव विधान सभा निवडणुकीच्या आचारसंहितेत लटकण्याची शक्यता होती. त्यामुळे सोमवार व मंगळवारी बेस्ट समितीची तातडीची बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करण्यात आला.या खाजगी बसगाड्यांमध्ये चालक त्या बस पुरवठादारांचा असणार आहे. या बसगाड्या पॉर्इंट टू पॉर्इंट चालविण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांसमोर मान्य केले आहे. मात्र ते बेस्ट समिती व कामगार संघटना यांना अंधारात ठेवत आहेत, असे भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्ट समितीच्या निदर्शनास आणले. त्यामुळे याबाबत खुलासा करण्याची मागणी सदस्यांनी केली.मात्र बागडे यांनी, भाडेतत्त्वावरील बसगाडयांमध्ये चालक पुरवठादाराचाच असेल असे स्पष्ट करताना वाहक कोणाचा? हे सांगणे टाळले.>बसगाड्या घेणे अवाजवी...परिवहन विभाग आपल्या एका बसगाडीमधून ७० प्रवाशांची वाहतूक करीत प्रति किमी. वाहतुकीवर ८३ रुपये खर्च करते. तर आता भाडे तत्त्वावरील एक मिडी बस ३५ प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी प्रति किमी. साठी बेस्टकडून ७० रुपये खर्च घेणार आहे. त्यामुळे बेस्टसाठी या भाडे तत्वावरील बसगाड्या घेणे अवाजवी आहे, असा आरोप गणाचार्य यांनी यावेळी केला.