मुंबई : राज्यातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या विशेष हिताच्या विविध योजना राबविणे हे बांधकाम कामगार योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार मुंबईतील कामगारांसाठीदेखील विविध योजना राबविण्यात येत आहेत. नवीन कामगारांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, कामगारांचे जीवनमान सुधारणे, योजनांचा लाभ मिळण्याच्या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणे, लाभार्थीस त्वरित लाभ देणे इत्यादी योजना आहेत. कामगारांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी या योजनांची मदत होते.
१८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांना नोंदणी करता येते. तसेच बारा महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार नोंदणी करू शकतात. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करता येते, असेही सांगण्यात आले आहे.
नोंदणीसाठी काय लागते ? मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म - व्ही भरून अर्ज सादर करताना काही दस्तऐवज अनिवार्य आहेत. करताना काही दस्तऐवज अनिवार्य आहेत. ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे ३ फोटो नोंदणी शुल्क- रु.२५ व ५ वर्षासाठी वार्षिक वर्गणी रू. ६०/-
कोणकोणत्या आहेत योजना? सामाजिक साहाय्य योजना पहिल्या विवाह खर्चासाठी ३०,००० रुपये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना शैक्षणिक आर्थिक साहाय्य योजना कामगारांच्या इयत्ता १ ते ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २,५०० रुपये इयत्ता १० ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १०,००० रुपये इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५,००० रुपये पदवी अभ्यासक्रमासाठी २०,००० रुपये वैद्यकीय पदवीसाठी १,००,००० रुपये आरोग्य साहाय्य योजना कामावर कामगाराचा मृत्यू झाल्यास ५ लाख नैसर्गिक मृत्यूस २ लाख रुपये अंत्यविधीसाठी १० हजार रुपये विधुर पतीस २४ हजार रुपये गृहकर्जावरील व्याजासाठी मदत मोफत माध्यान्ह भोजन