कंत्राटदाराला पाच लाखांचा दंड
By admin | Published: May 26, 2016 01:43 AM2016-05-26T01:43:13+5:302016-05-26T01:43:13+5:30
गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये रेल नीर या पाणी बाटलीची विक्री होत नसल्याने त्याविरोधात आक्षेप घेणाऱ्या भार्इंदर येथील गुप्ता दाम्पत्याला संबंधित कंत्राटदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मारहाण
मुंबई : गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये रेल नीर या पाणी बाटलीची विक्री होत नसल्याने त्याविरोधात आक्षेप घेणाऱ्या भार्इंदर येथील गुप्ता दाम्पत्याला संबंधित कंत्राटदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना समोर आल्यानंतर पश्चिम रेल्वेने पॅन्ट्री कारमधील केटरिंगचे कंत्राटदार असलेले सनशाइन कॅटरर्सला तब्बल पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल यांच्याकडून देण्यात आले आहेत. भार्इंदरचे प्रदीप गुप्ता आपल्या कुटुंबीयांसह उत्तर प्रदेशमधील आपल्या गावी गेले होते. त्यांनी २२ एप्रिल रोजी गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये सनशाइन कॅटरर्सच्या कर्मचाऱ्याकडे पाण्याची बाटली मागितली.
मात्र रेल्वेची रेल नीर ही
पाण्याची बाटली न देता दुसऱ्या कंपनीची बाटली दिली. ही विक्री बेकायदा असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. त्याच दिवशी रात्री दहाच्या सुमारास कंत्राटदाराचा कर्मचारी दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना घेऊन
आला आणि गुप्ता यांना मारहाण केली होती. (प्रतिनिधी)