Join us  

पाच अल्पवयीन बांगलादेशी ताब्यात

By admin | Published: May 27, 2014 1:13 AM

कळंब परिसरात असलेल्या अनधिकृत रिसॉर्ट्समधील अनैतिक व्यवसाय चव्हाट्यावर आले

वसई : कळंब परिसरात असलेल्या अनधिकृत रिसॉर्ट्समधील अनैतिक व्यवसाय चव्हाट्यावर आले असतानाच राजोडी येथील विकास रिसॉर्ट्सवर काल रविवारी अर्नाळा सागरी पोलीस व ठाणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून पाच अल्पवयीन मुली व पाच कर्मचार्‍यांना अटक केली आहे. या सर्व मुली बांगलादेशीय असल्याचे सांगण्यात येत आहे. भार्इंदर येथील एका सामाजिक संस्थेला राजोडी येथील विकास रिसॉर्ट्समध्ये अनैतिक धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या रिसॉर्ट्सवर संयुक्त कारवाई करून ५ अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले, तर या रिसॉर्ट्समध्ये काम करणारे मुकेश शानी (२३), देबू देवनाथ (३६), सुदर्शन कोटीयन (२८), युवराज राणे (२९) व प्रितेश गोवारी (२५) या पाच जणांना अटक केली आहे. या सर्व मुली बांगलादेशच्या असून त्यांच्याकडे पारपत्र व व्हिजा नसल्याने हे तरूण त्यांना धमकावून जबरदस्ती अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)