पाच महिन्याच्या आणि एक वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण, ठाण्यात २२ रुग्ण झाले कोरोनामुक्त, तीन दिवसात ९ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 07:07 PM2020-04-22T19:07:57+5:302020-04-22T19:09:20+5:30

ठाण्यात तीन दिवसात ९ रुग्ण बरे झाले असल्याने ही आनंदाची बातमी आहे. मात्र दुसरीकडे ठाण्यातील क्रांती नगर भागातील एका पाच महिन्याच्या आणि पारसिक नगर येथील एक वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Five-month-old and one-year-old child infected with corona, 22 patients in Thane became corona-free, 9 patients corona-free in three days | पाच महिन्याच्या आणि एक वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण, ठाण्यात २२ रुग्ण झाले कोरोनामुक्त, तीन दिवसात ९ रुग्ण कोरोनामुक्त

पाच महिन्याच्या आणि एक वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण, ठाण्यात २२ रुग्ण झाले कोरोनामुक्त, तीन दिवसात ९ रुग्ण कोरोनामुक्त

Next

ठाणे : एकीकडे ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात आजच्या घडीला १६५ कोरोना बाधीत असून, त्यातील ६ जणांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे. परंतु दुसरीकडे आनंदाची गोष्टही पुढे आली आहे. या रुग्णांपैकी आतापर्यंत २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर मागील तीन दिवसात ९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दुसरीकडे ही आनंदाची गोष्ट असली तरी देखील ठाण्यात एका पाच महिन्याच्या आणि १ वर्षाच्या दोन लहानग्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
                 ठाणे शहरात अनेक ठिकाणी नागरीक आजही जागरुक नसल्याचे दिसत आहेत. तर पालिका प्रशासनाच्या चुकांमुळे देखील रुग्णांच्या संख्येत आजच्या घडीला वाढ होतांना दिसत आहे. मागील काही दिवसात रोज ५ ते १० रुग्ण शहरात आढळत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही १६५ च्या घरात गेली आहे. दुसरीकडे कोरोनामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे ही देखील गंभीर बाब आहे. अशातच मंगळवारी ठाण्यात कोरोना बाधीत १० रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामध्ये एका पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश असून घरातील काही व्यक्तींच्या संपर्कातून त्याला ही लागण झाल्याचे पालिकेचे म्हणने आहे. दुसरीकडे कळवा पारसिक नगर भागातील एका एक वर्षीय बालकालाही कोरोनाची लागण झाली असून आता या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
दरम्यान दुसरीकडे ठाणे शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांत जवळपास ९ रूग्ण उपचारानंतर बे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण २२ रूग्ण बरे होवून कोरोनामुक्त झाले आहेत ठाणे शहरामध्ये कोरोना बाधित रूगणांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजुला कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाणही वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसात तब्बल ९ रूग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत एकूण २२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
या सर्व रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालय, तसेच इतर खाजगी हॉस्पीटल आदी विविध कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. या सर्व रूग्णांची १४ दिवसानंतर कोव्हीड चाचणी करण्यात आली होती. ती चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
 

Web Title: Five-month-old and one-year-old child infected with corona, 22 patients in Thane became corona-free, 9 patients corona-free in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.