वाहतूककोंडीतून सुटका करणार पाच नवीन पूल, महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:21 AM2019-02-07T04:21:35+5:302019-02-07T04:22:42+5:30

मोडकळीस आलेल्या पुलांच्या दुरूस्तीबरोबरचे मुंबईत काही नवीन पूल उभे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईची कोंडी फुटून वाहतुकीला वेग मिळणार आहे.

Five new bridges, the decision of the corporation to get relief from traffic congestion | वाहतूककोंडीतून सुटका करणार पाच नवीन पूल, महापालिकेचा निर्णय

वाहतूककोंडीतून सुटका करणार पाच नवीन पूल, महापालिकेचा निर्णय

Next

मुंबई - मोडकळीस आलेल्या पुलांच्या दुरूस्तीबरोबरचे मुंबईत काही नवीन पूल उभे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईची कोंडी फुटून वाहतुकीला वेग मिळणार आहे.

मुंबईतील अनेक पूल ब्रिटिशकालिन आहेत. या पुलांचे महापालिकेने स्ट्रक्चरल आॅडिट दोन वर्षांपूर्वी केले. मात्र अद्याप दुरूस्ती करण्यात आली नव्हती. गेल्या वर्षी धोकादायक पूल पडण्याच्या घटनेने महापालिकेची झोप उडवली. अखेर धोकादायक पुलांची दुरुस्ती आणि नवीन पूल बांधण्याचे काम सुरू होत आहे. यासाठी तब्बल सहाशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नवीन पाच पुलांसाठी ३७.४३ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहे. यामध्ये सात रस्ता जंक्शनला होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी महालक्ष्मी येथे पूल, मालाड इन्फिनिटी मॉल, अंधेरी लोखंडवाला ते मालाडला जोडणारा उन्नत मार्ग, अंधेरी येथे आणखी एक पूल, कमल अमरोही स्टुडियोजवळ जोगेश्वरीच्या दक्षिण दिशेला पूल बांधण्यात येणार आहे.

अशी होणार दुरूस्ती

किरकोळ दुरूस्ती म्हणजे पुलांवरील गळती रोखण्याचे काम केले जाणार आहे़ मोठ्या दुरूस्त्यांमध्ये पुलाला धोका निर्माण करणाऱ्या दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. धोकादायक व पडण्याच्या स्थितीत असलेल्या पुलांची दुरूस्ती तात्काळ होणार आहे.

२०१६ मध्ये महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून ४१ जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने ३१४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते.

या अहवालानुसार १४ पूल पाडून पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तर ४७ पुलांची मोठी दुरूस्ती, १७६ पुलांची किरकोळ दुरूस्ती करण्यात देणार आहे.

हा अहवाल लांबणीवर पडला. त्यानंतर गेल्या वर्षी अंधेरी येथील गोखले पूल पडल्यानंतर पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला.

Web Title: Five new bridges, the decision of the corporation to get relief from traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई