थोडक्यात पाच बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:05 AM2021-05-24T04:05:27+5:302021-05-24T04:05:27+5:30

मुंबई : सदाशिव नाईक चौक येथे महानगरपालिकेने सांडपाणी पाईपलाईनचे काम सुरू केल्याने महर्षी दयानंद कॉलेज ते भारतमाता सिनेमा जंक्शन, ...

Five news in a nutshell | थोडक्यात पाच बातम्या

थोडक्यात पाच बातम्या

Next

मुंबई : सदाशिव नाईक चौक येथे महानगरपालिकेने सांडपाणी पाईपलाईनचे काम सुरू केल्याने महर्षी दयानंद कॉलेज ते भारतमाता सिनेमा जंक्शन, लालबाग दरम्यानचा मार्ग वाहतुकीस बंद केल्याने बस मार्ग ९, १४, ६१, ६७, ६९, २०० हे डाऊन दिशेत ई बोर्जेस मार्गे ३१ मे पर्यंत परावर्तित करण्यात आले आहेत.

रस्त्याच्या कामाचे साहित्य फूटपाथवर

मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर सायनपासून कुर्ला येथील कमानीपर्यंत विविध ठिकाणी रस्त्यालगत मोठ्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ही कामे सुरू असल्याने मुळात हा रस्ता आणखी अरुंद झाला आहे. यात भर म्हणून कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाचे बहुतांश साहित्य रस्त्यालगतच्या फूटपाथवर मांडले आहे. परिणामी पादचारी वर्गास चालण्यास जागा शिल्लक राहिली नाही.

बेस्ट मार्ग वळविले

मुंबई : दहिसर सबवे येथे खोदकाम सुरू असल्याने बस मार्ग २०७, २०८, ७०७ व ७२० सुधीर फडके उड्डाणपूल मार्गे वळविण्यात आले आहेत. हे काम चार दिवस चालेल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.

नियमांना केराची टोपली

मुंबई : कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी कठोर निर्बंध जारी करण्यात आले असले तरी दादर पूर्व आणि पश्चिम येथील बाजारपेठांत सगळ्या नियमांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. दिलेल्या वेळीनंतरही येथील बहुतांश दुकाने सुरू असून, भरलेल्या बाजारपेठांमध्ये उसळलेल्या गर्दीने सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजले आहेत.

गहाळ, जमा झालेल्या फोनची माहिती उपलब्ध

मुंबई : बेस्ट बसगाडीमध्ये एप्रिल २०२१ महिन्यात गहाळ झालेल्या व बेस्टकडे जमा झालेल्या भ्रमणध्वनी संचाची सूची प्रशासनाने अपडेट केली असून, वडाळा गहाळ वस्तू विभाग संपर्काची अधिक माहिती बेस्ट उपक्रमाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Five news in a nutshell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.