मुंबई : रविवारी पूर्व उपनगरात एक, पश्चिम उपनगरात एक अशा दोन ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळल्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या. या तक्रारी संबंधित विभागाला कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले.
------------------
सहा ठिकाणी शॉर्टसर्किट
मुंबई
मुंबई शहरात चार, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण सहा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले.
------------------
पाच ठिकाणी झाडे कोसळली
मुंबई येथे दिवसभर पाऊस कोसळत असतानाच शहरात दोन, पूर्व उपनगरांत एक, पश्चिम उपनगरात दोन अशा पाच ठिकाणी झाडे कोसळली. तक्रारी पडताळणीकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आल्या असून, फांद्या उचलण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले.
------------------
विज्ञानगंगा व्याख्यानमाला
मुंबई
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा या व्याख्यानमालेत प्रतिकार कोविड-१९ चा योग्य ‘आहार विहार’ या विषयावर अन्नशास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले यांचे व्याख्यान मराठीतून होणार आहे. १७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता झूम व फेसबुक लाईव्हद्वारे होणारे हे व्याख्यान सर्वांकरिता विनामूल्य आहे.
------------------
तलावांची पाहणी
मुंबई
महानगरपालिकेतर्फे श्री गणेशोत्सव–२०२१ ची तयारी सर्वत्र सुरू आहे. या अनुषंगाने स्थापत्य समितीचे अध्यक्ष स्वप्निल टेंबवलकर, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर तसेच एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षा दीपमाला बढे यांनी भांडुप येथील गणेशघाट, पवई तलाव व भांडुपेश्वर कुंड तसेच मुलुंड येथील मोरया उद्यान तलाव या गणेशमूर्ती विसर्जन तलावांची पाहणी केली.