बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 09:06 PM2024-10-18T21:06:33+5:302024-10-18T21:11:00+5:30

मनीषा म्हात्रे मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन ...

Five people arrested from Dombivli, Ambernath, Panvel in baba siddique murder case, who is accused? | बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र

बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र

मनीषा म्हात्रे
मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे याच्या टोळीचे कनेक्शनही उघड झाले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेने सप्रेसह त्याच्या अंबरनाथ आणि पनवेल येथील साथीदारांना अटक केली आहे. आरोपींनी शुटर्सना शस्त्र पुरविल्याची माहिती समोर येत आहे.

डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे (३२) याच्यासह अंबरनाथमधील संभाजी पारधी (४४), प्रदीप दत्तू ठोंबरे (३७) चेतन दिलीप पारधी (२७) आणि पनवेलमधील राम फुलचंद कानोजिया (४३) यांना अटक करण्यात आली आहे.

सप्रे होता शुभम लोणकरच्या संपर्कात 

या गँगचा सप्रे प्रमुख असून तो अकोटमधील पसार आरोपी शुभम लोणकरच्या संपर्कात होता. नितीनवर हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद आहे. नितीन हा रामच्या मदतीने त्याची टोळी चालवत होता. शस्त्रासंबंधित तो शुभम लोणकरच्या संपर्कात आला.

शुभम पाठोपाठ तो झिशान अख्तरच्या संपर्कात होता. त्यांच्या सांगण्यावरून या कटात सहभागी होत, त्याने साथीदारांच्या मदतीने तीन बंदुका मारेकऱ्यांना दिल्या. ज्या गुन्हे शाखेने जप्त केल्या आहे.

कर्जतमध्ये एक रात्र होते सोबत

धर्मराज राधे कश्यप आणि शिवकुमार गौतम उर्फ शिवा  हे दोघे जण या टोळीसोबत कर्जतमध्ये असलेल्या एका झोपडीत ऑगस्टमध्ये एक रात्र सोबत होते. काही पैसेसुद्धा या टोळीने त्यांना पुरवले. पुढे सप्टेंबर महिन्यात आरोपींनी त्यांना शस्त्र पुरवले आहे. 

त्यांच्या संपर्कात आणखीन कोण आहे? याचा तपास सुरू आहे. उत्तर भारतातून त्यांना शस्त्र मिळाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अटक आरोपींच्या चौकशीतून या टोळीचा सहभाग स्पष्ट होताच गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे या पाच जणांना अटक केली आहे.  याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

सलमान खान गोळीबार प्रकरणातही सहभाग? 

कश्यप आणि शिवा या टोळीसोबत कर्जतला थांबले होते. कर्जतरून पनवेल जवळ आहे. पनवेलमध्ये सलमान खानचे फार्महाऊस आहे. या टोळीचा सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सहभाग आहे का? हे देखील गुन्हे शाखा तपासात आहे.

Web Title: Five people arrested from Dombivli, Ambernath, Panvel in baba siddique murder case, who is accused?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.