मुंबईतील हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी पाच कलमी कृती योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:49 PM2020-09-04T14:49:14+5:302020-09-04T14:49:51+5:30

बायोडायव्हर्सिटी बाय द बे या अभियानाची घोषणा

Five point action plan for maintaining greenery in Mumbai | मुंबईतील हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी पाच कलमी कृती योजना

मुंबईतील हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी पाच कलमी कृती योजना

Next

मुंबई : मुंबईतील हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी काम करणा-या सिटीझन्स कलेक्टिव संस्थेने बायोडायव्हर्सिटी बाय द बे या अभियानाची घोषणा केली आहे. शहरातील जैवविविधता व हिरवाई संरक्षित करण्यासाठी हवामानावर समावेशक व सक्रिय चर्चेचे नेतृत्व करणा-या तरुण व प्रगतीशील मुंबईकरांची चळवळ निर्माण करण्याचा उद्देश या अभियानापुढे आहे. या उद्दिष्टाशी सुसंगती राखत, शहराची समृद्ध जैवविविधता जपण्यासाठी सरकारला कृतीकरिता प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने तरुण आणि या विषयातील तज्ज्ञ एकत्र आले असून पाच कलमी कृती योजना आखण्यात आली आहे.    

गेल्या काही दशकांत शहरांतील उद्याने व नैसर्गिक जंगले कमी होत चालली आहेत. विकासाच्या नावाखाली कल्याण व उपजीविकेची सुरक्षितता दुर्लक्षिली जात जात आहे. पाणथळ जागांवरील फ्लेमिंगोंची संख्या अनेक पटींनी वाढली असल्याने या जागांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाश्वतता व आधुनिकतेचा मेळ साधणा-या मुंबईतील जैवविविधता व हिरवाईचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी तरुण मुंबईकर एकत्र आले आहेत. या अभियानामध्ये मुंबई महानगरपालिकेसारख्या प्रमुख संबंधितांसोबत संवाद साधण्याचा तसेच पर्यावरणआदित्य ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईतील जैवविविधतेच्या भवितव्यावर संभाषण सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे.

--------------------------

मुंबईसाठी पाच कलमी कृती योजना आखण्यात आली आहे.
- कमी संख्येतील फ्लेमिंगो व त्यांच्या वस्ती स्थानांच्या संरक्षणाचा समावेश यात आहे.
- आरेला वन म्हणून मान्यता देणे.
- मुंबईतील हिरवाईचे संरक्षण करणे.
- कोळी समुदायाच्या उपजीविकेसाठी समुदायातील सदस्यांशी चर्चा करून सहाय्यात्मक धोरणाचा प्रस्ताव ठेवणे.
- मुंबईतील उद्याने वाढवणे व त्यांचे संरक्षण करणे आदी शिफारशींचा समावेश आहे.

--------------------------

- अशाश्वत नियोजन व जलदगतीने वाढणारे कार्बन उत्सर्जन यांमुळे मुंबई गंभीर स्थितीत पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
- शहरातील समृद्ध परिसंस्था व अनन्य जैवविविधता धोक्यात आहे.
- शहरातील ६० टक्के हिरवळ गेल्या ४० वर्षात नष्ट झाली.
- शहराच्या केवळ १३ टक्के भागावर हिरवळ आहे.
- गोरेगाव, अंधेरी पश्चिम आणि मालाड या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे.
- २००१ मध्ये हिरवळीचे क्षेत्र ६२.५ टक्के होते.
- २०११ मध्ये हिरवळीचे क्षेत्र १७ टक्क्यांवर आले.

--------------------------

निसर्ग संकटात आहे. मानवजातीच्या इतिहासातील कोणत्याही काळाच्या तुलनेत १००० पट अधिक वेगाने आपल्या प्रजाती नष्ट होत आहेत. १ दशलक्ष प्रजाती नामशेष झाल्या आहेत. निसर्गाला संकटातून बाहेर काढण्याची संधी २०२० या वर्षाने आपल्याला दिली आहे. म्हणूनच आम्ही बायोडायव्हर्सिटी बाय द बे हे अभियान सुरू करत आहोत. मुंबईतील नैसर्गिक जैववैविध्यपूर्ण परिसंस्थांचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा सर्व मुंबईकरांनी केली पाहिजे.
- भगवान केशभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन

--------------------------

 

मुंबईला जर शाश्वत नगरनियोजनाची कास धरण्याची गरज असेल तर या चळवळीचे नेतृत्व लोकांनी केले पाहिजे. उद्यानांसारख्या सामाईक सुविधांमधील नागरिकांच्या सहभागामुळे सरकारला धोरणे आखण्यासाठी कृती योग्य फीडबॅक मिळतो.
- अंतरा वासुदेव

 

 

Web Title: Five point action plan for maintaining greenery in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.