म्हाडात पहिल्याच दिवशी पाच पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:35+5:302021-03-26T04:06:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांची मोफत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांची मोफत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून गुरुवारी आलेल्या १८२ अभ्यांगतांपैकी ५ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
म्हाडा कार्यालयास दररोज सुमारे दोन हजार नागरिक भेट देतात. त्यामुळे म्हाडास भेट देणाऱ्या अभ्यांगतांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अपूर्व लॅब आणि जनहित डायग्नोस्टिक या लॅबोरेटोरीज मार्फत ही चाचणी करण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना कलिना कॅम्प येथील कोरोना हेल्थ केअर सेन्टरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन इमारतीत शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, बँक आणि न्यायालय असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता कोरोना चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच जनजागृती करणारी भित्तीपत्रके म्हाडा मुख्यालयात लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.