- विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तब्बल चार दशकं दिल्लीतील एका फूटपाथवर चहा बनविताना आपल्यातील साहित्यिकाला अजरामर करणारे लक्ष्मण राव यांची दखल दिल्लीतील एका प्रख्यात पंचतारांकित हॉटेलने घेतली. आता त्यांचा चहा आणि ३० पुस्तके, कादंबऱ्या देशी, विदेशी नागरिकांना मोहिनी घालत आहे. (who is Laxman Natthuji Shirbhate?)
लक्ष्मण राव म्हणजे लक्ष्मण नत्थुजी शिरभाते हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील आहेत. १९७० मध्ये याच परिसरात एका सूतगिरणीत मजूर म्हणून काम करीत होते. जेमतेम दहावी शिकलेले लक्ष्मण यांच्या डोक्यात विविध व्यक्तिरेखांबाबत मंथन सुरूअसायचे. गिरणी बंद पडल्यावर त्यांनी थेट दिल्ली गाठली. बांधकामाच्या ठिकाणी विटा उचलण्याचे काम केले.
सूतगिरणीमध्ये कामाला असताना पहिलवान रामदास उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मामाच्या गावाला आला. त्याचे एका मुलीवर प्रेम झाले, रामदासवर गावातील लोकांच्या नजरा होत्या. पोहण्यात तरबेज असलेल्या रामदासला नदीच्या पात्रात डुबकी मारण्याची इच्छा झाली. त्याने सूर मारला, तो नदीच्या डोहातून बाहेर आलाच नाही. या सत्यकथेवर आधारित लक्ष्मण रावची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. तिचे नाव ‘रामदास’! आता त्यांची ग्रंथसंपदा ही ३० झाली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लक्ष्मण राव यांना घरी बोलवून त्यांचे कौतुकही केले होते.
काम आटाेपले की पुन्हा फूटपाथवरकनॉट प्लेसमधील एका सुविख्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये लक्ष्मण राव ‘टी कन्सल्टंट’ म्हणून काम करतात. दररोज ४०० जणांना त्यांच्या हातचा चहा मिळतो. हॉटेल व्यवस्थापनाने राव यांची सगळी पुस्तके हॉटेलमध्ये प्रदर्शित केली आहेत. इथले काम आटोपले की, लक्ष्मण राव परत पुन्हा फूटपाथवर परततात.
कोण आहेत राव?राव यांनी १९७७ मध्ये दिल्लीतील आयटीओशेजारील विष्णू दिगंबर मार्गावर फूटपाथ हॉकरचा परवाना मिळाल्यानंतर चहाची टपरी सुरु केली. याच काळात त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बी.ए., एम. ए. ची पदवी घेतली. स्वत:चे भारतीय साहित्य कला प्रकाशन सुरु केले.
साहित्य संपदाद बॅरिस्टर गांधी, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परंपरा से जुडी भारतीय राजनिती, मानविकी हिंदी साहित्य, रामदास, नर्मदा, रेणू, दंश, पत्तियो की सरसराहट, अहंकार, दृष्टीकोण, अभिव्यक्ती, साहिल, प्रात:काल, पश्चिम के साहित्यकार, व्यक्तित्व, अभिव्यंजना, प्रासंगिक अपराध इ.