फाईव्ह स्टार : स्वच्छ मुंबईसाठी महापालिकेचा आटापिटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 06:22 PM2020-12-01T18:22:02+5:302020-12-01T18:22:33+5:30
clean Mumbai : १४ डिसेंबरपर्यंत सूचना व आक्षेप कळविण्याचे आवाहन
मुंबई : महापालिकेने गेल्या वर्षी स्वच्छतेसाठी पायाभूत सुविधा, माहिती-शिक्षण-संवाद अंतर्गत उपक्रम, क्षमता बांधणी असे काम केले आहे. परिणामी घरोघरी कचरा संकलन, कचरा वर्गीकरण, कचरा निर्माण करणा-या संस्थांतर्फे कच-याची जागेवर विल्हेवाट, प्लास्टिक बंदी, कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट असे बदल दिसून आले. परिणामी आता स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महापालिका आटापिटा करत आहे.
मुंबई महापालिकेने कचरामुक्त तारांकित शहर मध्ये मुंबईला पंचतारांकित (५ स्टार) साठी नागरिकांचे आक्षेप व अभिप्राय मागविले आहेत. १४ डिसेंबर किंवा त्यापूर्वी हे कळविण्यात यावे, असे आवाहन केले आहे. स्वच्छतेची चांगली पातळी गाठण्यासाठी केंद्राने कचरामुक्त तारांकित शहरचे निकष ठरविले आहेत. शहरांना प्रगतिशील सुधारणांसह स्वच्छतेच्या ७ स्टारचे ध्येय गाठता येतील, अशा प्रकारे हे निकष आहेत. दरम्यान, हगणदारीमुक्त मुंबईसाठी नागरिकांनी आक्षेप अथवा सूचना असल्यास त्यांनी १४ डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी कळवाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शौचालयाची योग्य ती स्थिती आणि देखभाल ठेऊन हगणदारीमुक्तचे ध्येय गाठता येतील, अशा प्रकारचे हे निकष आहेत.