Join us

देशातील पाच राज्यांत काेराेनाचे ८० टक्के नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील पाच राज्यांत काेराेनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, नवीन ८० टक्के रुग्णांची नाेंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील पाच राज्यांत काेराेनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, नवीन ८० टक्के रुग्णांची नाेंद झाली आहे.

देशातील सक्रिय रुग्ण वाढण्यामागे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या राज्यातील रुग्णसंख्या कारणीभूत आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण ७६.४८ टक्के इतके आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारसह त्या - त्या ठिकाणचे राज्य सरकारही सतर्क झाले असून, त्यांनी कठोर निर्बंधांची प्रक्रिया हाती घेतली आहे.

देशात दैनंदिन रुग्णसंख्या वाढीस महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतील संसर्ग कारणीभूत आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत त्यांचे प्रमाण तब्बल ८०.६३ टक्के इतके आहे. राज्यात सलग दोन दिवस २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर पंजाबमध्ये २ हजार ३६९, केरळमध्ये १ हजार ८९९ इतके रुग्ण आढळले. सध्या देशात २ लाख ७१ हजार २८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून, १ मार्च रोजी काेराेना पॉझिटिव्हिटी दर १० टक्के होता तो आता १६ टक्के झाला आहे.

राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक दिवशी १ लाख ३८ हजार ९५७ डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र, ते आणखी वाढवावे, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोस देण्यात आले असून, ३१ लाख ३८ हजार ४६३ डोस उपलब्ध आहेत.

.........................