Join us

त्या पाच जणांचे हात पुणो स्फोटात?

By admin | Published: December 10, 2014 2:00 AM

मध्य प्रदेशातील कारागृहातून पसार झालेले सिमीचे ते पाच अतिरेकी पुण्याच्या फरासखाना बॉम्बस्फोटामागे असावेत, असा दाट संशय महाराट्र एटीएससह अन्य सुरक्षा यंत्रणांना असल्याची माहिती मिळते.

देशभर अॅलर्ट : मध्य प्रदेश कारागृहातून पसार झाल्यानंतर महाराष्ट्रात दडल्याचा संशय
मुंबई : मध्य प्रदेशातील कारागृहातून पसार झालेले सिमीचे ते पाच अतिरेकी पुण्याच्या फरासखाना बॉम्बस्फोटामागे असावेत, असा दाट संशय महाराट्र एटीएससह अन्य सुरक्षा यंत्रणांना असल्याची माहिती मिळते. हे पाच जण आपल्या अन्य साथीदारांसह महाराष्ट्र, कर्नाटक किंवा राजस्थानात लपून बसले आहेत. येत्या काळात या टोळीकडून घातपाती कारवाया घडू शकतात, असे अचूक इनपुटस गुप्तहेर संघटनांनी देशभरातल्या सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. 
महोंमद एजाजुद्दीन, महोंमद अस्लम, अमजद खान, झाकीर हुसेन सादिक आणि मेहबूब गुड्डू अशी त्यांची नावे आहेत. हे पाचही संशयित अतिरेकी सीमीच्या मध्य प्रदेशातील खांडवा मॉडय़ूल असून, पुण्यातील फरासखाना स्फोटाशी त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रंकडून मिळते. 
यासोबतच सप्टेंबरमध्ये घडलेला उत्तर प्रदेशातील बीजनोर स्फोट, तेलंगणातील करीमनगर येथील बँकेवर फेब्रुवारी महिन्यात पडलेला दरोडा आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकात बंगळुरू - गुवाहाटी एक्सप्रेसमध्ये घडलेला बॉम्बस्फोट या सर्वच दहशतवादी कारवायांमध्ये या पाच जणांना सहभाग असावा, 
असाही दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.
सुरक्षा यंत्रणांना सीमीचे हे मॉडय़ूल आणि इंडियन मुजाहिदीनमध्येही संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. मुजाहिदीनच्या तौकीरने या मॉडय़ूलला 2क्क्6मध्ये केरळात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले होते. तसेच या मॉडय़ूलने मुजाहिदीनच्या अतिरेक्यांना वेळोवेळी सुरक्षित आसरा पुरविला होता. हे मॉडय़ूल अचानक सक्रिय होण्यामागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढणो हा एकमेव हेतू असल्याचा संशयही या यंत्रणांकडून व्यक्त होतो.
हे पाच जण फरार झाल्यापासून देशभरातील सुरक्षा यंत्रणा त्यांच्या मागावर आहेत. त्यातच केंद्रीय गुप्तहेर संघटनांनी हे पाच जण महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये वेषांतर करून पुढल्या हल्ल्यांची तयारी करीत असावेत, 
अशी माहिती त्या त्या राज्यांना पुरविल्याचीही माहिती 
मिळते.  (प्रतिनिधी) 
 
2क्12मध्ये महाराष्ट्र एटीएसने या पाच जणांना अटक केली होती. सीमीच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकावणो, त्यांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी देशाबाहेर धाडणो, मुजाहिदीनच्या अतिरेक्यांना सर्वतोपरी सहकार्य करणो आणि महाराष्ट्रात आपली संघटना मजबूत करणो, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. 
लूटमार, बँक दरोडे घालून हाती आलेल्या पैशांचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी करणो यात हे मॉडय़ूल माहिर असल्याचे एटीएसच्या तेव्हाच्या तपासातून स्पष्ट झाले होते.