मुंबई : मुंबईत सध्या पाच हजार २०१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे, तर २२ ते २८ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.०५ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४०५ दिवसांवर आला आहे.
मुंबईत गुरुवारी ३४० रुग्णांचे निदान झाले असून, १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी कोरोनाबाधितांची एकूण संख्या सात लाख ३५ हजार ५०५ झाली आहे. बळींची संख्या १५ हजार ८०८ झाली आहे. दिवसभरात ४०३ रुग्ण बरे झाले असून, सात लाख १२ हजार १०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन पाच असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५४ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील तीन हजार ३४४ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.