Join us

गणेशोत्सवावर पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 3:17 AM

तसेच राज्य दहशतवाद विरोधी विभाग (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), फोर्सवन आणि सिव्हील डिफेन्स फोर्स, सशस्त्र पोलीस दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दल सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन असणार आहेत.         

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा गणेशोत्सव कोरोनाच्या संकटातही निर्विघ्न पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरात बसविण्यात आलेल्या सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच सीसीटीव्ही व्हॅनच्या मदतीने पोलीस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून पोलीस गणेशोत्सव काळात संपूर्ण शहरावर नजर ठेवणार आहेत. गणेशोत्सव आणि मोहरम निमित्ताने  ५०० महिला व पुरुष अंमलदार ठिकठिकाणी तैनात असणार आहेत. यात सुरक्षेच्या दृष्टीने गर्दी होणाºया लालबाग गणपती मंडळ ३० महिला व पुरुष अमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा सज्ज आहे. तर दीड दिवस गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी १ हजार पोलीस अंमलदार सज्ज असतील. यात, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची १ कंपनी तर एसआरपीएफच्या तीन तुकड्या दिमतीला असतील. तसेच राज्य दहशतवाद विरोधी विभाग (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), फोर्सवन आणि सिव्हील डिफेन्स फोर्स, सशस्त्र पोलीस दल, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दल सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन असणार आहेत.         प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत गणपती मंडळाच्या ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. तसेच बंदोबस्तासाठी स्वयंसेवक, एनसीसी व तटरक्षक स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येणार आहे.>आरोग्यविषयक उपक्रम राबवा’पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मूर्ती ४, तर घरगुती मूर्ती २ फुटांची असावी. तसेच आरती व पूजा विसर्जनस्थळी न करता घरीच करावी. रस्त्यावर गर्दी करू नये. ध्वनी प्रदूषण टाळावे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम राबवावे असे आवाहन पोलिसांनी केले.

टॅग्स :सीसीटीव्ही