Join us

मालमत्ता कराने ओलांडला पाच हजार कोटींचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 6:16 AM

जकात कर रद्द झाल्यानंतर उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनलेल्या मालमत्ता कराचे लक्ष्य यंदा थोडक्यात चुकले. तरी सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात पाच हजार कोटी उत्पन्नाचा आकडा महापालिकेने पार केला आहे.

मुंबई : जकात कर रद्द झाल्यानंतर उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनलेल्या मालमत्ता कराचे लक्ष्य यंदा थोडक्यात चुकले. तरी सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात पाच हजार कोटी उत्पन्नाचा आकडा महापालिकेने पार केला आहे. मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकविणाऱ्या बड्या धेंडांविरोधात पालिकेने नुकतीच जप्तीची कारवाई सुरू केली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली तीनशे कोटी रुपयांनी अधिक आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कर वसुलीने तब्बल पाच हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे.पालिकेचा आर्थिक कणा बनलेला जकात कर रद्द होऊन वस्तू व सेवा कर २०१७ पासून लागू झाला आहे. जकात कर रद्द झाल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान राज्य सरकार भरून देत आहे. तरीही महापालिकेचा आर्थिक कणा मजबूत राहण्यासाठी मालमत्ता कराच्या जास्तीतजास्त वसुलीवर या वर्षी भर देण्यात आला. मात्र मालमत्ता कराची अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने पालिकेचे तब्बल नऊ हजार कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे सन २०१७-२०१८चे लक्ष्य गाठण्यास पालिकेला यश आले आहे. तरीही ५० कोटी रुपये कमी पडत असल्याचे पालिका अधिकाºयांनी कबूल केले.अधिकाºयांचा सन्मानकर निर्धारण व संकलन खात्याने सुरू केलेल्या मोहिमेमुळे पालिकेला मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठता आले. हे काम मेहनतीने व तत्परतेने करणाºया अधिकाºयांचे प्रशासनाने नुकतेच कौतुक केले. करनिर्धारण व संकलन खात्याचे उप करनिर्धारक व संकलक प्रल्हाद कलकोटी व अरविंद चव्हाण या अधिकाºयांचा ‘एप्रिल २०१८’ या ‘महिन्याचे मानकरी’ म्हणून महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.अशी झाली वसुली२०१७-१८मध्ये पालिकेच्या करनिरर्धारण व संकलन खात्याकडे पाच हजार ४०२ कोटींचे उद्दिष्ट होते. सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत दोन हजार ८८ कोटी एवढीच रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली. मालमत्ता कर न भरणाºयांवर कारवाई सुरू केल्यानंतर डिसेंबर २०१८ अखेर तीन हजार ६६ कोटी, तर फेब्रुवारी अखेर तीन हजार ७४६ कोटी जमा झाले. त्यानंतर मार्च महिन्यात १ हजार ३८६ कोटी रुपये मालमत्ता करापोटी जमा झाले.>यंदा अधिक वसुलीवर्षभरात तब्बल पाच हजार १३२ कोटी व ७५ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. जे गेल्या वर्षीच्या मालमत्ता कर वसुलीपेक्षा २८५ कोटींनी अधिक आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कर वसुलीचा तब्बल पाच हजार कोटींचा टप्पा ओलांडण्यात आला आहे.