मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामासाठी पाच हजार कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:33 AM2019-11-06T02:33:50+5:302019-11-06T02:34:02+5:30

सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणार काम : १४ टक्के काम पूर्ण, पुढील टप्पे लवकरच

Five thousand employees for the work of Mumbai Trans Harbor Link | मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामासाठी पाच हजार कर्मचारी

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामासाठी पाच हजार कर्मचारी

Next

मुंबई : शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामाला आता गती आली आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएने तब्बल पाच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले. आतापर्यंत या प्रकल्पाचे १४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

एमएमआरडीएतर्फे प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाची एकूण लांबी २२ किमी आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १७ हजार ८४३ कोटी रुपये इतका आहे. या प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या पाच हजार कर्मचाऱ्यांपैकी ४३०० कर्मचारी हे कुशल आणि अकुशल असून ७०० तांत्रिक अभियंते आहेत. मुदतीमध्ये काम संपवण्यासाठी एमएमआरडीएने इतके मनुष्यबळ वापरले आहे. एमएमआरडीएने मार्च, २०१८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला तीन टप्प्यांमध्ये सुरुवात केली आहे. शंभर टक्के जिओ ग्राफिकल सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याचेही एमएमआरडीएमार्फत सांगण्यात आले. दोन्ही बाजूंकडील जमिनीवरील पुलाची एकूण लांबी ५.५ किलोमीटर इतकी आहे. खाडीवरील पुलाची लांबी १६.५ किमी इतकी आहे. या पुलावरून दरताशी शंभरच्या वेगाने प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पामध्ये वाहनांसाठी सहा लेन असणार आहेत, तर एक अतिरिक्त लेन आपत्कालीन व्यवस्थेसाठी असणार आहे.

असा आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प
च्लांबी - २२ कि.मी.
च्समुद्रामध्ये - १६.५ कि.मी. लांबीचा पूल समुद्रामध्ये
च्जमीन - ५.५ कि.मी. जमिनीवर पुलाचा भाग
च्प्रकल्पाचा खर्च - १७,८४३ कोटी रुपये
च्मार्गिका - सहा मार्गिका
च्पूर्ण करण्याचा कालावधी - सप्टेंबर, २०२२

Web Title: Five thousand employees for the work of Mumbai Trans Harbor Link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई