पाच हजार नेत्रदानांचा संकल्प
By admin | Published: August 24, 2015 12:58 AM2015-08-24T00:58:44+5:302015-08-24T00:58:44+5:30
नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व पटावे आणि त्यांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्था सरसावली आहे. संस्थेने राष्ट्रीय
मुंबई : नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व पटावे आणि त्यांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्था सरसावली आहे. संस्थेने राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यांतर्गत नेत्रदानाची मोहीम हाती घेतली असून, संस्थेने तब्बल ५ हजार नेत्रदानाचा संकल्प केला आहे.
२५ आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत आॅनलाइन नेत्रदान, देहदान संकल्प पत्र नोंदणी सुविधा सुरू करण्यात येईल. प्रदर्शन भरवणे, सभा घेणे, जनजागृतीपर पत्रकांचे वितरण करणे, मोबाइल अॅप सुरू करणे, प्रत्यक्ष नेत्रदान संकल्प पत्रे भरून घेणे, भित्तीपत्र, पथनाट्य, रॅली आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून नेत्रदानाच्या जनजागृतीवर भर देण्यात येईल. संस्थेला याकामी नेत्रतज्ज्ञ, मंडळे, नॅब, महाविद्यालय आणि रुग्णालय मदत करणार आहेत. गतवर्षी करण्यात आलेल्या संकल्पाद्वारे ८ यशस्वी नेत्रदान झाले असून, १६ अंध व्यक्तींना दृष्टी लाभली आहे. २५ आॅगस्ट १९८६ रोजी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. म्हणून हा पंधरवडा हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून देशात सर्वत्र साजरा केला जातो. (प्रतिनिधी)