आयटीआयच्या पाच हजार जागा वाढल्या; १२ जूनपासून सुरु होणार ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 09:02 AM2023-06-07T09:02:44+5:302023-06-07T09:03:58+5:30
यंदा १२ जूनपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिल्ली डीजीटीकडून संलग्नता मिळाल्याने यंदा आयटीआयच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात २५७ तुकड्यांना ही संलग्नता लागू झाली असून, त्यामुळे आयटीआयच्या तब्बल ५ हजार १४० जागा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे, यात काही नवीन तुकड्यांना मान्यता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, यंदा १२ जूनपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ही प्रवेश प्रक्रिया संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यावर्षी ४१८ शासकीय आयटीआयमध्ये ९५ हजार ३८० तर ५७४ अशासकीय आयटीआयमध्ये ५९ हजार १२ अशा एकूण १ लाख ५४ हजार ३९२ जागांवर प्रवेश होणार आहेत. आयटीआय संस्थांमधील यंदा उपलब्ध जागांपैकी ५३ हजार ६०० जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी २० हजार ७२, अनुसूचित जमातीसाठी १० हजार हजार ४३९, विमुक्त जाती ४ हजार ६३१, भटक्या जमाती (ब)साठी ३ हजार ८५९, (क)साठी ५ हजार ४०४ (ड) यासाठी ३८८ एवढ्या जागा उपलब्ध आहेत. अल्पसंख्याक उमेदवारांसाठी २ हजार ५४८, दिव्यांग उमेदवारांसाठी ७ हजार ७१९ व खुल्या गटातील उमेदवारांसाठी ६१ हजार ७५६ जागा उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी ८३ व्यवसाय उपलब्ध
प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ८३ असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल आहे. डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन ८०८, इतर मागासवर्ग २९ हजार टेक्निशियन यासारख्या आधुनिक ३३५, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १५ तंत्रज्ञानावर आधारित समावेश आला आहे.
अशी असेल प्रक्रिया
- प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण (एटीकेटी) अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय प्रवेशासाठी पात्र असणार आहेत.
- यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाइन करता येणार आहेत.