Join us

‘सरपंच अ‍ॅवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:31 AM

मुंबई : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत.

मुंबई : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. लवकरच पुणे जिल्हा पातळीवरील सोहळा होणार आहे़ त्यानंतर राज्यपातळीवरील सोहळा होईल़गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड-२०१७’ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. गावाच्या विकासासाठी झटणाºया सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या अठरा जिल्ह्यांतून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. जनतेनेही उत्स्फूर्तपणे सरपंचांची नामांकने दाखल केली आहेत. त्यामुळे पुरस्कारांबाबत प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगिण काम करणाºया सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द ईयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण तेरा पुरस्कार दिले जाणार आहेत.सुरुवातीला जिल्हा पातळीवर हे पुरस्कार दिले जातील. त्यानंतर या विजेत्यांचे राज्यपातळीसाठी नामांकन होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील. राज्यात कोण आदर्श ठरणार? याची ग्रामीण महाराष्टÑाला प्रचंड उत्सुकता आहे.जिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने समाजातील तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे. या ज्युरींमार्फत प्रत्येक नामांकनाची छाननी होऊन विजेत्यांवर मोहोर उमटवली जाईल. त्यामुळे विजेते कोण राहणार? हे सोहळ्यातच स्पष्ट होणार आहे.‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने राज्य विधिमंडळापासून ते देशाचे सर्वोच्च कायदेमंडळ असणाºया पार्लमेंटरी सदस्यांचा गौरव केला आहे़ तळागाळातील व्यक्तींच्या आदर्श कार्याला ओळखून लोकशाहीला बळकटी देण्यासाठीच ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ आपले गाव हाच आपला अभिमान आहे आणि इथेच आमची लोकशाही मूल्ये सर्वांत महत्त्वाची असली पाहिजेत. जय हिंद!-विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहभारतीय ट्रॅक्टर उद्योगात निर्विवाद नेता म्हणून आम्ही नेहमी कृषी उत्पादकता आणि ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित केले़ ते शेतकºयांपर्यंत पोहोचविले़ शेतकºयांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही लोकमतसोबत सरपंच पुरस्कार देण्यासाठी सहभाग घेतला आहे़- रवींद्र शहाणे, उपाध्यक्ष (पणन), महिंद्रा फार्म डिव्हिजन.लोकमत सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला़ असा अभूतपूर्व कार्यक्रम घेण्यात बीकेटी टायर्सला आनंद होत आहे़ बीकेटी टायर्स मीडिया प्रमोशन आणि रोड शो यांचाही आम्हाला चांगला फायदा झाला आहे़ आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये लोकांची रुची वाढत आहे़-राजीव पोद्दार, सहव्यवस्थापकीय संचालक, बीकेटी टायर्सपुरस्कारांसाठीचे जिल्हेअकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत यावर्षी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.पार्लमेंट ते पंचायत‘लोकमत’ने आदर्श खासदारांना गौरविण्यासाठी पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्ड सुरू केले आहेत. अशा प्रकारचा पुरस्कार सुरू करणारा ‘लोकमत’ हा पहिला माध्यम समूह ठरला आहे. संसद ते गाव हा प्रवास करत ‘लोकमत’ आता सरपंचांनाही गौरवित आहे. राज्यातील जनतेने या पुरस्काराचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.सोहळ्यात होणार मंथनसरपंच अ‍ॅवॉर्डच्या जिल्हापातळीवरील सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामविकास व पंचायतराजबाबत महत्त्वपूर्ण मंथन या सोहळ्यात घडणार आहे. जिल्हाभरातून सरपंच या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसादया पुरस्कार योजनेत पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़ या नामांकनात नामवंत ग्रामपंचायतींसह दुर्गम भागातील सरपंचांच्या नामांकनांचाही सहभाग आहे. यानिमित्ताने अनेक नवख्या गावांच्या यशोगाथाही समोर येणार आहेत.