पाच हजार वृक्षांनी बहरला उंबर्डे फाट्याचा डोंगर

By admin | Published: December 5, 2014 10:59 PM2014-12-05T22:59:25+5:302014-12-05T22:59:25+5:30

पर्यावरणाचे रक्षण व संगोपनाचा उपक्रम श्री सदस्यांच्या सेवाभावी वृत्तीने राबवून वनराई बहरली आहे.

The five-thousand-year-old tree is full of mountainous canopy | पाच हजार वृक्षांनी बहरला उंबर्डे फाट्याचा डोंगर

पाच हजार वृक्षांनी बहरला उंबर्डे फाट्याचा डोंगर

Next

पेण : निरूपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पेणमधील ‘श्री’ सदस्यांनी गेल्यावर्षी ८ जुलै २०१३ रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त उंबर्डे फाटा-खाचराखिंड डोंगरावर १५ एकर क्षेत्रावर तब्बल ४८२५ विविध प्रजातीचे वृक्षारोपण केले होते. पर्यावरणाचे रक्षण व संगोपनाचा उपक्रम श्री सदस्यांच्या सेवाभावी वृत्तीने राबवून वनराई बहरली आहे. या समाजोपयोगी उपक्रमाने खाचरखिंड परिसर कृतार्थ पावला असल्याचे विलोभनीय दृष्य पहावयास मिळत आहे.
समाजाला अभिप्रेत असणारे व त्या उद्दिष्टांची आजच्या वास्तविक जीवनात गरजेचे असलेला पर्यावरण संतुलनाचा यशस्वी पायलट प्रोजेक्ट डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कृतीतून साकारला. गेले १६ महिने वृक्षलागवड केल्यापासून दर रविवार ५०० ते ५५० श्री सदस्य या प्रकल्पाचे संगोपन करण्यासाठी झटत होते. आज या वृक्षाचे आयुष्य अवघे दोन वर्षाचे (लागवड केल्यापासून) पण १५ एकर जागेत ओळीने डोंगर उतार, माथा, पठार अशा टप्प्यात केलेली शास्त्रशुध्द लागवड, प्रत्येक झाडाला दिलेले नंबर, त्यांची देखभाल, त्यास लागणारा पाणी पुरवठा व औषधोपचार यांची नोंद ठेवून वृक्षांना आजूबाजूला उपजणारे तण काढणे, दर महिन्यास मातीचा भर टाकणे, मान्सूनचा कालखंड वगळता पाणी व्यवस्थापन व कोणत्या झाडाचे आरोग्य कशाप्रकारे आहे या नोंदीची आठवडाभरात दखल घेवून केलेल्या प्रतिबंधक उपाययोजना व श्री सदस्यांच्या परिश्रमाचा सहभागामुळे पर्यावरण संतुलनाचा एक उत्तम प्रोजेक्ट ४८२५ वृक्षांच्या बहरातून एक हिरवीगार वनश्री श्री सदस्यांच्या सेवाभावातून साकारली आहे.
पेण फॉरेस्टच्या अधिकारात असलेला हा डोंगर उजाड माळरान होता, आता पहाताक्षणी बहरणाऱ्या प्रत्येक पांथस्थाला या परिसराचे बदललेले रूप पहाताना निश्चितच आनंद वाटेल. अनेक डोंगर फोडून पर्यावरणाचा विध्वंस सुरू असून, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. रस्ते, महामार्ग, नागरी वस्त्या यांच्या भरावासाठी डोंगराचे लचके तोडून प्रकृतीला विदू्रप करण्याची चढाओढ सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: The five-thousand-year-old tree is full of mountainous canopy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.