अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला पाच वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:09 AM2019-03-07T01:09:42+5:302019-03-07T01:09:47+5:30
दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिला धमकवण्याचा प्रकार बांगुरनगर परिसरात घडला होता.
मुंबई : दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिला धमकवण्याचा प्रकार बांगुरनगर परिसरात घडला होता. याप्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी केलेल्या तपासामुळे दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपीला पाच वषार्ची कैद आणि दंड ठोठावला आहे.
संदिपकुमार चिंता कश्यप (२३) असे याप्रकरणी दोषी आढळलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बांगुरनगर पोलीस ठाण्यात १२ मे, २०१७ मध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी २९ जून, २०१७ मध्ये त्याच्याविरोधात दिंडोशी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार २८ फेब्रुवारी, २०१९ ला विशेष सत्र न्यायाधीश देव यांनी त्याला पाच वर्षाची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने कारावासाच्या शिक्षेत वाढ करण्याची शिक्षा सुनावली आहे. जवळपास दहा साक्षीदारांचे जबाब तसेच अन्य महत्वाचे पुरावे कश्यपविरोधात गोळा करण्यात तपास अधिकारी तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुरवाडे, आर. बी. आंबेकर आणि हवालदार के. व्ही. दळवी यांनी मेहनत घेतली. गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये राहणारी पीडित मुलगी तिच्या बहिणीसोबत वडिलांना शोधायला गेली होती.