जेरिट जॉनला पाच वर्षांची शिक्षा
By Admin | Published: October 10, 2015 05:40 AM2015-10-10T05:40:37+5:302015-10-10T05:40:37+5:30
प्रेयसीवर अॅसिडहल्ला केल्याप्रकरणी ‘नो-नॉनसेन्स’ प्रॉडक्शन हाउसचा मालक जेरिट जॉनला शुक्रवारी विशेष महिला न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
न्यायालय : प्रेयसीवर केला होता अॅसिडहल्ला
मुंबई : प्रेयसीवर अॅसिडहल्ला केल्याप्रकरणी ‘नो-नॉनसेन्स’ प्रॉडक्शन हाउसचा मालक जेरिट जॉनला शुक्रवारी विशेष महिला न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच २० हजारांचा दंडही ठोठावला. जेरिट गेली तीन वर्षे कारागृहातच असल्याने त्याला आणखी दोन वर्षे गजाआड काढावी लागणार आहेत.
विशेष महिला न्यायालयाने ठोठावलेला २० हजारांच्या दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, असा आदेश विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी दिला. न्यायालयाने जेरिटला आयपीसी कलम ३२६ (गंभीर दुखापत करणे), ४५२ व ३४२ अंतर्गत दोषी ठरवत ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.