Join us

टेलिकॉलरसह पाच तरुणींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 5:52 AM

‘तुम्हाला स्पा करायचे असल्यास ‘स्पा@युअर होम’मध्ये या, असे कॉल सेंटरमधून फोन करून ग्राहकांना आवाहन करणाऱ्या तिघींसह एकूण पाच तरुणींना गुरुवारी अटक करण्यात आली.

मुंबई : ‘तुम्हाला स्पा करायचे असल्यास ‘स्पा@युअर होम’मध्ये या, असे कॉल सेंटरमधून फोन करून ग्राहकांना आवाहन करणाऱ्या तिघींसह एकूण पाच तरुणींना गुरुवारी अटक करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली असून, यात आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रजनीशकुमार सिंग या रजनीश वेलनेस लिमिटेड कंपनीच्या प्रमुखाला कक्ष ९ चे प्रमुख महेश देसाई यांच्या पथकाने सोमवारी अटक केली. घटनास्थळी देसाई यांच्या पथकाला मिळालेले काही पुरावे आणि सिंग यांच्या चौकशीनंतर पाच महिलांना गुरुवारी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणी या वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. त्यातील दोघी या पर्यवेक्षक तर तिघी टेलिकॉलर म्हणून काम करायच्या. या सर्व जणी दादर, वरळी, माहिम, गिरगाव आणि भायखळा परिसरात राहणाºया आहेत. या तिन्ही कॉलर महिनाभरापासून तर अन्य दोघी आठ ते नऊ महिन्यांपासून या कॉल सेंटरमध्ये काम करीत होत्या. रजनीश वेलनेस लिमिटेड कंपनीच्या लोअर परळ कार्यालयात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालतो याची माहिती कॉल सेंटरमधील या पाचही जणींना होती, असेही तपासात उघड झाले आहे.घटनास्थळी एक डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्या डायरीचाही वापर करून पोलीस या प्रकरणी अधिकाधिक माहिती गोळा करीत आहेत. त्यानुसार या प्रकरणी आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.>असे चालायचे ‘कॉल सेंटर’!कॉल सेंटरमध्ये काम करणाºया तीन कॉलरना ग्राहकांना फोन करून ‘तुम्हाला स्पा पाहिजे का?’ अशी विचारणा करण्याचे काम सोपविण्यात आले होते. एखाद्या व्यक्तीने होकारार्थी उत्तर दिले की पुढची जबाबदार पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाºया दोघींची होती. त्या ग्राहकाला नेमकी कोणती सेवा हवी याबाबत विचारणा करून त्याच्याकडे मुलगी पाठवायची व्यवस्था करायच्या. यासाठी कॉलरना पगार तर पर्यवेक्षक मुलींना कमिशन मिळायचे. हॉटेल बुकिंगची जबाबदारी ग्राहकांची असायची.