माथेरान : माथेरान हे दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत सापडत आहे. येथे भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन येथील समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी त्यांच्या दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन दिले. येथील झोपडपट्टी मागील चार दशकांपासून अस्तित्वात असताना त्यांना वार्षिक भुईभाडे नगरपरिषद आकारत आहे, परंतु सर्वच झोपड्यांवर आजपर्यंत अनधिकृत शिक्का मारण्यात आल्याने सर्वांवर शासनाची टांगती तलवार आहे. या झोपड्या अधिकृत कराव्यात, त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील वाहनतळावर वनविभागाच्या वाहनतळाच्या जागेत जागा अपुरी पडत असून तेथील रिक्त प्लॉट क्र .९३ हा नगरपरिषदेकडे हस्तांतरित केल्यास पार्किंगची समस्या मार्गी लागू शकते. असे या निवेदना म्हटले आहे. (वार्ताहर)
माथेरानमधील समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2016 2:18 AM