महिला प्रवाशांची सुरक्षा प्राधान्याने सोडवा, उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 06:50 PM2019-06-28T18:50:02+5:302019-06-28T18:51:10+5:30

रेल्वे पोलिसांना सराईत गुन्हेगारांवर एमपीडिए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेन्जरस अॅक्टिव्हिटी) लावण्याचे अधिकार देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार 

Fixation of Security Priority of Women Travel in railway, Deputy Secretary Neelam Gorhe's Instructions | महिला प्रवाशांची सुरक्षा प्राधान्याने सोडवा, उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सूचना

महिला प्रवाशांची सुरक्षा प्राधान्याने सोडवा, उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सूचना

Next

मुंबई - धावत्या लोकलमध्ये बाटली फेकून मारल्यामुळे एक महिला जखमी झाली होती. तसेच रेल्वेतील महिला प्रवासांची सुरक्षितता या अनुषंगाने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफचे अधिकारी, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. त्यामध्ये रेल्वेच्या आतील व रेल्वेच्या बाहेरून  महिलांना होणारा त्रास याबाबत सर्व यंत्रणांनी सजग राहून महिलांचा प्रवास सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. 

अनेकदा पुरुष फेरीवाले महिला डब्यात घुसणे, महिला डब्यात प्रवेश करण्याअगोदर डबा अस्वच्छ करणे, धावत्या गाडीवर दगडफेक करणे, बिभित्स हावभाव करणे, विनयभंगासारखे गंभीर गुन्हे करणे अशा प्रकारचे घटना दररोज घडत असतात अशा घटनांमुळे अनेक महिला गंभीररीत्या जखमी होतात, तर अनेकदा आपला जीवही गमवातात. त्यामुळे सर्व यंत्रणांनी सतर्क राहून महिला प्रवाशांच्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे असे  निर्देश गोऱ्हे यांनी दिले.

याबैठकीत रेल्वे पोलीस यांनी सराईत गुन्हेगार यांना महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेन्जरस अॅक्टिव्हिटी (एमपीडिए) लावण्याबाबत काही निर्बंध आहेत. त्याबाबत सरकारकडे कायदा प्रलंबित आहेत. त्यासाठी पोलीस अधिकारी यांनी गोऱ्हे यांना लक्ष घालण्याची विनंती केली असून गोऱ्हे यांनी गृहविभागाला याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. महिला प्रवासी संघटनेने महिलांच्या डब्यात पुरुष हॉकर्स येत असल्याचे गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत रेल्वे पोलीस आयुक्त सेनगावनकार यांनी तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वस्त केले. 

यामध्ये ज्या ठिकाणी दगडफेक होते अशा जागा निश्चित करणे, तेथील नागरिकांची मदत घेणे व अशा समाजकंटकांना सतत देखरेखीखाली ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सर्व पोलीस यंत्रणा व रेल्वे प्रशासन यांचेमध्ये समन्वय ठेवून शीघ्र कृती दलामार्फत कारवाई करावी, असेही निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. तसेच ज्या महिलांना दुखापत होते किंवा जीव गमवावा लागतो, अशा महिलांना रेल्वे प्रशासनाने तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही केल्या. या बैठकीला रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक दिघावकर, उपायुक्त रेल्वे पुरुषोत्तम कराड, स्मिता ढाकणे रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरुण त्रिपाठी सेन्ट्रल रेल्वे, लता अरगडे तेजस्विनी महिला प्रवासी संघटना, क्षितिज गुरव सहायक आयुक्त आरपीएफ, शशांक सावंत कक्ष अधिकारी गृहविभाग, डहाणू व वैतरणा प्रवासी संघटनेचे प्रथमेश प्रभुतेंडुलकर, ऋत लिंगायत उपस्थित होते. 
 

Web Title: Fixation of Security Priority of Women Travel in railway, Deputy Secretary Neelam Gorhe's Instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.