Join us

झंडा उँचा रहे हमारा..... देशभरात तिरंग्याला सलामी, सोशल मीडिया 'हिंद'मय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 8:41 AM

देशभरात आज 70 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येत आहे.

मुंबई - देशभरात आज 70 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील शाळेपासून ते लाल किल्ल्यापर्यंत सर्वत्र तिंरगा फडकविण्यात येत आहे. तर, विजयी विश्व तिरंगा प्यारा म्हणत... देशभक्तीच्या गीतांनी दिवसाची सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाही सकाळपासून 'हिंद'मय झाला आहे. जय हिंद, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा, प्रजासत्ताक दिन चिरायू होवो, वंदे मातरम.. अशा संदेशांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देशभक्ती फिवर दिसत आहे.  

प्रजासत्ताक दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार एखाद्या सणासारखाच आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो. 15 ऑगष्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण, देशाची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. त्यामुळे हा दिवस 'प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. राज्यघटनेनुसार खऱ्या अर्थाने देशात प्रजेची सत्ता या दिवसापासून लागू झाली आहे. 

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली सर्वच भारतीयांना मिळाला. राजधानी दिल्लीत या दिवशी सकाळीच ध्वजारोहण केले जाते. त्यानंतर नंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून 'प्रजासत्ताक दिन' साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेऱ्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा, आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. लहानपणापासूनच चिमुकल्यांच्या मनात देशभक्ती आणि भारतमातेबद्दलचं प्रेम वृद्धींगत करण्याच काम आजच्या दिवसाकडून होत असतं.

टॅग्स :प्रजासत्ताक दिनसोशल मीडियाफेसबुक