Independence Day: बाधित गर्भवतींची सेवा करणाऱ्या परिचारिकेच्या हस्ते ध्वजारोहण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:22 AM2020-08-15T02:22:25+5:302020-08-15T02:22:46+5:30
नायगावमधील मंडळाचा स्तुत्य उपक्रम : गेली अनेक वर्षे सेवेत
मुंबई : दादर, नायगाव येथील बीडीडी चाळ क्रमांक ६ ए, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी परिचारिका दीपाली साळवी यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे साळवी यांनी कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या वॉर्डमध्ये सेवा दिली आहे़ त्यामुळे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे, असा निर्णय मंडळाचे माजी सचिव शशिकांत बर्वे यांनी घेतला.
या निर्णयाला आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकमताने संमती दिली़ त्यानुसार १५ आॅगस्टला सकाळी ११ वाजता साळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे़ तसेच त्यांचा या वेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात येणार आहे़ नायगाव येथे महापालिकेच्या प्रसूतिगृहात अनेक वर्षे साळवी या परिचारिका म्हणून कार्यरत आहेत़ कोरोना संकटात या रुग्णालयात संसर्ग झालेल्या किंवा लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांना उपचारासाठी ठेवण्यात आले होते़ सुरुवातीला येथे रुग्णसंख्या कमी होती़ गर्भवती असल्याने या महिलांची विशेष काळजी घेणे आवश्यक होते़ त्यानुसार साळवी व त्यांच्या सहकार्यांनी या रुग्णांची काळजी घेतली़ त्याचे फलित म्हणजे येथील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही़
नायगाव येथे महापालिकेच्या प्रसूतिगृहात गेली अनेक वर्षे साळवी या परिचारिका म्हणून कार्यरत आहेत़ संसर्ग झालेल्या किंवा लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांना येथे ठेवले होते़