झेंडा हटला, उरलं केवळ इंजिन, मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:08 PM2020-01-20T19:08:11+5:302020-01-20T19:09:06+5:30
राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का? लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप
मुंबई - मनसे कार्यकर्त्यांना नवी दिशा देण्याचे सुतोवाच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या झेंड्यातील भगवा रंग नजरेत भरणारा असून महामेळाव्याकरिता लावलेली पोस्टर्स राज यांच्या नव्या महाराष्ट्र धर्माचे संकेत देत आहेत. आता, मनसेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ इंजिनाचा फोटो या दोन्ही प्रोफाईलवर दिसत आहे.
राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का? लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप व मनसे यांनी परस्परांवर बरीच चिखलफेक केल्यामुळे आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर मनसेबरोबर भाजपचा सूर जुळेल का? या व अशा अनेक मुद्द्यांबाबत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते व सर्वसामान्यांमद्ये चर्चा होताना दिसत आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 23 जानेवारीच्या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. बॅनर, पोस्टर, टॅगलाईन आणि प्रोफेशनल इव्हेंटप्रमाणे सगळं दिसून येत आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र, आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाचं जवळपास निश्चित झाल्याचं दिसून येतंय. आता, 23 जानेवारीलाच मनसेच्या नवीन झेंड्याच अनावरण होईल, अशी चर्चा सुरू आहे.
२३ जानेवारी २०२० रोजी मुंबईत होणाऱ्या #मनसे_अधिवेशनाचा नेत्रदीपक उद्घाटन सोहळा मनसे अध्यक्ष @RajThackeray ह्यांच्या हस्ते सकाळी ठीक ९ वाजता पार पडणार आहे.
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 20, 2020
आपला नम्र,
शिरीष सावंत,
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. pic.twitter.com/hjdKEiTHYy