Join us

धगधगत्या फेरीवाल्यांचा प्रवाशांना धोका

By admin | Published: August 24, 2015 1:04 AM

ज्वलनशील पदार्थ रेल्वेतून घेऊन जाण्यास मनाई असतानाही ते सररासपणे घेऊन जाण्याचे प्रकार फेरीवाल्यांकडून होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

मुंबई : ज्वलनशील पदार्थ रेल्वेतून घेऊन जाण्यास मनाई असतानाही ते सररासपणे घेऊन जाण्याचे प्रकार फेरीवाल्यांकडून होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाणे ते कर्जतपर्यंत चणे, शेंगदाणे विकणारे तब्बल १५0 फेरीवाले निखारे घेऊन लोकलमधून प्रवास करत असतात. याकडे आरपीएफचे (रेल्वे सुरक्षा दल) दुर्लक्ष होत असून, त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ज्वलनशील पदार्थ नेल्यास एक वर्षाची शिक्षा किंवा ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येऊ शकतो. परंतु फेरीवाले याकडे दुर्लक्ष करतात. उपनगरीय लोकलमध्ये वस्तू किंवा खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. ठाणे ते कर्जतपर्यंत असे चणे, शेंगदाणे विक्री करणारे तब्बल १५0 विक्रेते असल्याचे आरपीएफमधील सूत्रांकडून सांगण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गर्दी कमी असल्याने डाऊनच्या दिशेने ठाणे ते कर्जतदरम्यान चणे, शेंगदाण्याची विक्री करतात; तर रात्री ७नंतर १२ वाजेपर्यंत कर्जत ते ठाणे अशा अपच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये ते विक्री करतात.