अपोलो मिलजवळील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:48 AM2018-07-17T01:48:17+5:302018-07-17T01:48:20+5:30

नायगाव येथील मंडईत पर्यायी जागा मिळाल्यानंतरही पदपथ अडविणारे बेकायदा बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नुकतेच जमीनदोस्त केले.

Flatten the illegal construction near Apollo Mill | अपोलो मिलजवळील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

अपोलो मिलजवळील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

Next

मुंबई : नायगाव येथील मंडईत पर्यायी जागा मिळाल्यानंतरही पदपथ अडविणारे बेकायदा बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नुकतेच जमीनदोस्त केले़ गेल्या दहा वर्षांपासून ना.म. जोशी मार्ग पदपथाचा बेकायदा वापर होत होता़ अखेर न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने कौल दिल्यानंतर हे बांधकाम पाडण्यात यश आले आहे़
कॉम्रेड गणाचार्य चौकाकडून लोअर परेल स्टेशनकडे जातानाच्या ना. म. जोशी मार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियम-सोनल पेट्रोलपंपाजवळ आणि अपोलो मिलच्या फाटकाजवळील पदपथावर गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे बेकायदा बांधकाम उभे राहिले होते. त्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय होत होता. हे बांधकाम पदपथावर असल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा होत होता़ ज्यामुळे अनेक वेळा पादचाºयांना रस्त्यावरून चालावे लागत होते़ परिणामी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा व पादचाºयांच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता़
या जागेवर व्यवसाय करणाºया व्यक्तीला २००८ मध्येच पात्र ठरवत दादर, नायगाव मंडई येथे पर्यायी जागा देण्यात आली होती़ मात्र, संबंधित व्यक्तीने याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती़ अखेर न्यायालयाने महापालिकेला कारवाई करण्याची अनुमती दिली़ त्यानुसार सोमवारी ही कारवाई करण्यात आली़ या कारवाईत जी दक्षिण विभागाचे ३५ कामगार-अधिकारी सहभागी झाले होते. एक जेसीबी, दोन गॅस कटर, दोन ट्रक आदी वाहने आणि साधनसामग्री वापरण्यात आली.
संबंधित अनधिकृत बांधकाम हटविण्यात आल्यानंतर पदपथावरील त्या ठिकाणी तत्काळ योग्य ते बांधकाम करण्यात येऊन पदपथ सलग करण्यात आला आहे, अशीही माहिती जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.

Web Title: Flatten the illegal construction near Apollo Mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.