पळण्यासाठी आरोपीची मिठी नदीत उडी
By admin | Published: November 26, 2014 12:57 AM2014-11-26T00:57:06+5:302014-11-26T00:57:06+5:30
चोरलेला ऐवज शोधत असताना आरोपीने पोलिसांना चकमा देत मिठी नदीत उडी घेतल्याची घटना आज कुर्ला येथे घडली.
Next
मुंबई: चोरलेला ऐवज शोधत असताना आरोपीने पोलिसांना चकमा देत मिठी नदीत उडी घेतल्याची घटना आज कुर्ला येथे घडली. मात्र पोलिसांनी चारी बाजूने वेढा घालून या आरोपीला अगAीशामक दलाच्या मदतीने बाहेर काढत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अॅन्टॉपहिल परिसरात दुचाकींची चोरी होत होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली. सोमवारी अशाच प्रकारे पोलीस परिसरामध्ये गस्त घालत असताना त्यांना महिद्रसिंह श्रेष्टी उर्फ सलीम हा संशयास्पद फिरत असताना आढळला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता तो दुचाकी चोरच असल्याचे समोर आले.
त्यानुसार अॅन्टॉप हिल पोलिसांनी त्याच्याकडे चोरलेल्या दुचाकींची चौकशी केली. अधिक चौकशी केली असता चोरलेल्या दुचाकी कुर्ला परिसरातील भंगार बाजारात विकल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाले आणि त्यांचे पथक या दुचाकी शोधण्यासाठी कुर्ला परिसरात गेले. यावेळी पोलिसांनी या आरोपीला सुध्दा सोबत घेतले होते. कुल्र्यातील मिठी नदी परिसरातून पोलीस या आरोपीला घेउन जात असताना आरोपीने एका पोलीस शिपायाचा हात झटकून पळ काढला. मात्र पोलिसांनी देखील त्याचा पाठलाग केल्याने त्यांने तत्काळ मीठी नदीमध्ये उडी घेतली.
अॅन्टॉपहिल पोलीस ठाण्याच्या या पथकाने आरोपीला चारी बाजूने घेरुन कुर्ला पोलीस तसेच अगAीशामक दालाकडे मदत मागितली. काही वेळातच या ठिकाणी कुर्ला पोलीस आणि अगAीशामक दल दाखल झाले. त्यानुसार अग्नीशामक दलाच्या जवानांनी मिठी नदीमध्ये उतरुन या आरोपीला बाहेर काढले. त्याच्या पोटामध्ये पाणी गेल्या काही वेळ तो बेशुध्द झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)