फ्लेमिंगोंचे विराट दर्शन!
By admin | Published: March 2, 2015 03:39 AM2015-03-02T03:39:37+5:302015-03-02T03:39:37+5:30
शिवडी खाडीत उतरलेले सुमारे १५ हजार फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहण्यासाठी शनिवारी तब्बल ५ हजारावर पक्षीप्रेमींना गर्दी केली होती.
शिवडी खाडीत उतरलेले सुमारे १५ हजार फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहण्यासाठी शनिवारी तब्बल ५ हजारावर पक्षीप्रेमींना गर्दी केली होती. गुजरातेतील कच्छमध्ये फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.पावसाळ्यानंतर जेव्हा कच्छमध्ये पाणी आटते; तेव्हा फ्लेमिंगो स्थलांतर करतात. शिवडीसह नवी मुंबईत वास्तव्य करतात.
दहा वर्षांपूर्वी शिवडी खाडीत स्थलांतरण करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या सुमारे २० हजारांवर होती.परंतु येथील पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने येथे येणाऱ्या फ्लेमिंगोंच्या संख्येत उत्तरोत्तर घट होत आहे. मात्र त्यांना पहाण्यासाठी येणाऱ्या पक्षीप्रेमींची संख्या वाढत राहिली आहे.
याच पार्श्वभूमीवर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्यावतीने लहान मुलांना फ्लेमिंगो पाहता यावेत, म्हणून ‘फ्लेमिंगो महोत्सवा’चे आयोजन केले होते.सकाळी ११ वाजल्यापासून अबालवृद्धाचीप्रेमींची रीघ लागली.दुपारी चारपर्यंत पक्षीप्र्रेमींची संख्या वाढत होती. त्यांची संख्या पाच हजारांवर गेल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी दिवसभर आकाश मळभलेले होते. त्यानंतर अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्याने नागरिकांची गर्दी कमी होत गेली, अनेकांनी भिजत फ्लोमिंगोंना पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. ‘बीएनएचएस’च्या तज्ज्ञाकडून उपस्थितांना फ्लेमिंगोबद्दल सविस्तर माहिती देण्यात येत होती.