Join us

मुंबईच्या आकाशात टळली विमानांची टक्कर, २६१ प्रवाशांचे वाचले प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:17 AM

विस्तारा आणि एअर इंडियाच्या विरुद्ध दिशांना जाणाºया दोन विमानांची मुंबईजवळच्या आकाशात टक्कर होण्याची संभाव्य भीषण दुर्घटना ४ दिवसांपूर्वी सुदैवाने काही सेकंदांच्या अंतराने टळल्याचे उघड झाले असून

नवी दिल्ली : विस्तारा आणि एअर इंडियाच्या विरुद्ध दिशांना जाणाºया दोन विमानांची मुंबईजवळच्या आकाशात टक्कर होण्याची संभाव्य भीषण दुर्घटना ४ दिवसांपूर्वी सुदैवाने काही सेकंदांच्या अंतराने टळल्याचे उघड झाले असून, नागरी विमान वाहतूक संचालनालयाने या संदर्भात विस्तारा कंपनीच्या दोन वैमानिकांना विमानोड्डाणातून तूर्तास निलंबित केले आहे. ही दोन्ही विमाने परस्परांच्या ११० फूट एवढी धोकादायक जवळ आली होती व दैव बलवत्तर होते, म्हणूनच त्यातील २६१ प्रवाशांचे प्राण वाचले. भारतीय हवाई क्षेत्रात एवढ्या जवळच्या अंतराने टळलेली ही टक्कर म्हणजे गेल्या कित्येक वर्षात घडलेली संभाव्य अपघाताची घटना होती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.रशियात विमान कोसळून ७१ ठार-मॉस्को : मॉस्को या रशियाच्या राजधानीतून उड्डाण केलेले प्रवासी विमान रविवारी कोसळून सहा कर्मचारी व ६५ प्रवासी असे मिळून ७१ जण ठार झाले. हे विमान उराल पर्वतराजींतील आॅर्स्क या शहराकडे जात होते.मुंबईत एअर इंडियाच्या विमानाला आग-एअर इंडियाच्या मुंबई - अहमदाबाद एआय ०९१/ए ३२१ या विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये आग लागल्याने रविवारी रात्री ९.४६ वाजता होणारे उड्डाण रद्द करण्यात आले. विमानतळावरील एका अधिकाºयाला आग लागल्याचे आढळताच त्याने वैमानिकाशी संपर्क साधून दोन्ही इंजिने बंद करण्यास सांगितले. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले.

टॅग्स :एअर इंडिया