विमानांचे उड्डाण उशिराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:27 AM2018-05-28T04:27:52+5:302018-05-28T04:27:52+5:30
मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस त्रासदायक ठरला. विमानतळावर सध्या सुरू असलेल्या कामामुळे विमान वाहतुक अडखळत सुरू आहे.
मुंबई - मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस त्रासदायक ठरला. विमानतळावर सध्या सुरू असलेल्या कामामुळे विमान वाहतुक अडखळत सुरू आहे. रविवारी देखील विमानतळावर आगमन होणाºया व उड्डाण होणाºया विमानांना उशीर झाला त्यामुळे प्रवासी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत होते.
मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाºया विमानांचे उड्डाण सरासरी १ तास उशिराने होत होते. एकूण विमानांच्या ७२ टक्के म्हणजे ३२९ विमानांचे उड्डाण विलंबाने झाले. शनिवारी एकूण विमानांच्या तब्बल ८१ टक्के म्हणजे ३४३ विमानांचे उड्डाण विलंबाने झाले होते.
मुंबई विमानतळावर आगमन होणाºया विमानांना सरासरी पाऊण तास विलंब झाला. एकूण विमानांच्या ४७ टक्के म्हणजे २१७ विमानांचे विमानतळावर विलंबाने आगमन झाले. शनिवारी हे प्रमाण ३७ टक्के होते. म्हणजे १६४ विमानांचे आगमन विलंबाने झाले होते. रविवारी रात्री १० वाजेपर्यंत ही परिस्थिती होती.