डिलिव्हरी न झालेल्या ऑर्डरवर 'फ्लिपकार्ट'कडून तब्बल ६ वर्षांनी ग्राहकाला रिप्लाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:49 PM2024-06-27T17:49:33+5:302024-06-27T17:50:05+5:30
मुंबईतील एका व्यक्तीनं फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑर्डर दिल्यानंतर त्याला ती मिळालीच नाही. त्यानं तशी तक्रारही तेव्हाच केली होती.
मुंबईतील एका व्यक्तीनं फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑर्डर दिल्यानंतर त्याला ती मिळालीच नाही. त्यानं तशी तक्रारही तेव्हाच केली होती. त्यावर तब्बल ६ वर्षांनी फ्लिपकार्ट कस्टमर सपोर्ट टीमकडून कॉल आल्यानं ग्राहकही अचंबित झाला आहे. अहसान खारबाई नावाच्या तरुणानं त्याच्या एक्स हँडलवर फ्लिपकार्टबाबत आलेला एक विचित्र अनुभव शेअर केला आहे. त्यानं फ्लिपकार्टवरुन मागवलेल्या एका ऑर्डरचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. अहसानने मे २०१८ मध्ये स्पार्क्स कंपनीची चप्पल ऑर्डर केली होती. पण ६ वर्षांनंतरही तुमचे पार्सल डिलिव्हर्ड होत आहे असाच मेसेज दाखवत होता. तब्बल ६ वर्षांनी अहसान याला फ्लिपकार्टच्या कस्टमर सपोर्ट टीमकडून फोन आला आणि त्याला धक्काच बसला.
"माझ्या ६ वर्षांपूर्वीच्या एका ऑर्डरवर जेव्हा मला फोन आला तेव्हा मला धक्काच बसला", असं अहसान यानं एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. त्यानं ६ वर्षांपूर्वी फ्लिपकार्टवरून चप्पल मागवली होती. ती कधीच आली नाही. "मी रोज ऑर्डरचं स्टेटस बघायचो आणि ‘arriving today’ असाच मेसेज दाखवला जात होता. नुकतंच मी या ऑर्डरवर क्लिक केलं आणि नेमकं काय दाखवतंय ते पाहिलं. त्यानंतर मला काल फ्लिपकार्टकडून कॉल आला कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतंय हे त्यांनी मला चक्क ६ वर्षांनी विचारलं", असं अहसान याने सांगितलं. संपूर्ण प्रकार कस्टमर केअरला सांगितल्यानंतर त्यांनी माझी माफीही मागितल्याचं अहसान याने पुढे सांगितलं.
After 6 yrs @Flipkart called me for this order 😂
— Ahsan (@AHSANKHARBAI) June 25, 2024
Asking me what issue I was facing pic.twitter.com/WLHFrFW8FV
अहसान म्हणतो, ऑर्डर कॅश-ऑन-डिलिव्हरीसाठीची होती त्यामुळे मीही जास्त मनावर घेतलं नव्हतं आणि ऑर्डर रद्द करण्यासाठीचा तेव्हा कोणताच पर्याय अॅपवर दिसत नव्हता. मलाही ऑर्डर बंद करायची होती कारण ज्या ज्या वेळी मी अॅपच्या ऑर्डर सेक्शनमध्ये जायतो तेव्हा पहिली ऑर्डर तिच दिसायची जी कधीच माझ्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही. अहसान याच्या पोस्टवर नेटिझन्स भरभरुन व्यक्त होत आहेत. एक्स हँडलवर त्याच्या ट्विटला १.३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. काहींनी फ्लिपकार्टसोबतचा त्यांचा अनुभव देखील कमेंटमध्ये शेअर केला आहे.
Mere 2015 se out of delivery hai product. pic.twitter.com/iQw1elnkYd
— कृष राव 🇮🇳 (@KrrishRao_) June 26, 2024