रंग दे महाराष्ट्र आणि फ्लोटिंग कॅनव्हास मिळून राज्यातील शाळांची करणार रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:30 PM2018-05-07T19:30:12+5:302018-05-07T19:30:12+5:30

रंग दे महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील 350 शाळा आणि आंगणवाडींची रंगरंगोटी करण्याचा निर्धार केला आहे.

Floating Canvas Company joins hands with ‘Rang De Maharashtra’ to give rural Schools and Anganwadis a colourful makeover | रंग दे महाराष्ट्र आणि फ्लोटिंग कॅनव्हास मिळून राज्यातील शाळांची करणार रंगरंगोटी

रंग दे महाराष्ट्र आणि फ्लोटिंग कॅनव्हास मिळून राज्यातील शाळांची करणार रंगरंगोटी

Next

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या रंग दे महाराष्ट्र अभियानातून शाळा आणि आंगणवाडीच्या भिंती रंगवण्याचा उपक्रम सुरु आहे. रंग दे महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील मुठवली येथील शाळेच्या भिंती गेल्या आठवड्यात रंगल्या. हे रंगकाम एरवीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे यासाठी या भिंतींवर शैक्षणकि चित्ने चितारण्यात आली. आता फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीने रंग दे महाराष्ट्रशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळं आता या योजनेअंतर्गत शाळा व आंगणवाड्यांची रंगरंगोटी करण्यासाठी फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीही आपले योगदान देणार आहे. 

रंग दे महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील 350 शाळा आणि आंगणवाडींची रंगरंगोटी करण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये कला आधारित स्टार्टअप कंपनी फ्लोटिंग कॅनव्हासनेही हातमिळवणी केली आहे. याचीच झलक म्हणून मुंबईतील आंगणवाडीचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. 

सामाजिक समस्यांविषयी जागरुकता निर्माण करणे, सामाजिक विकासाच्या पातळीवर काम करण्यासाठी नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या मोहिमेअंतर्गत एमव्हीएसटीएफ (Maharashtra Village Social Transformation Foundation) संघटनेने आंतरराष्ट्रीय रंग दिनाचे औचित्य साधून रंगले महाराष्ट्र मोहिमेचे आयोजन केले होते. सदर मोहीम कन्साई  नेरोलॅक आणि टाटा ट्रस्टच्या भागीदारीतून  राबविण्यात येत आहे.‘रंग दे महाराष्ट्र’ उपक्रम राज्यातील साडेतीनशे शाळा, अंगणवाड्या व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.
 
रंग दे महाराष्ट्रा अंतर्गत सामाजिक संदेश -  
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या व ग्रामपंचायतीच्या भिंतीवर सामाजिक संदेशाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. तसेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीच्या इमारती केवळ रंगीत होणार नाहीत तर या उपक्रमाच्या सहभागातून अधिक जागरुकता निर्माण होणार आहे

फ्लोटिंग कॅनव्हास कंपनी बद्दल -
अगम मेहता, राहुल सिंग यादव आणि शक्ती स्वरूप साहू या तीन तरूणांनी फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीची सुरुवात स्टार्टअपने केली. ही कंपनी आवडत्या चित्रकारांची चित्रे अगदी नाममात्र दरात एका वर्षासाठी भाड्याने उपलब्ध करून देते. एखाद्या चित्राची किंमत 5 ते 6 हजार रूपये असल्यास तुम्हांला तुमच्या घरी हे चित्र फक्त 90 रूपयांत उपलब्ध करून दिले जाते. एका वषार्नंतर परत तितकेच पैसै तुम्ही भरल्यास तुम्हांला दुसरे चित्र पुढच्या वर्षीपर्यंत भाड्याने देण्यात येते.  एखादे चित्र वर्षभरासाठी भाड्याने आपल्या घरी लावण्यासाठी घेतले आणि काही दिवसांनी तुम्हांला ते नको असल्यास सहा महिन्यांनी तुम्ही ते बदलून घेऊ शकता. यासाठी अधिकचे भाडे आकारले जात नाही. ए-4, ए-5, ए-2 साईजमधील विविध चित्रांचे पर्याय कंपनीकडून दिले जातात. 
 

Web Title: Floating Canvas Company joins hands with ‘Rang De Maharashtra’ to give rural Schools and Anganwadis a colourful makeover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.