Join us

पोयसर नदीवर तरंगते बेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 2:13 AM

रिव्हर मार्चच्या सदस्यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांची मंगळवारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात भेट घेतली. भेटीमध्ये रिव्हर मार्चच्या सदस्यांनी कांदिवली येथील पोयसर नदीवर फ्लोटिंग आयलँड (तरंगते बेट)च्या प्रस्तावावर चर्चा केली. 

मुंबई : रिव्हर मार्चच्या सदस्यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांची मंगळवारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात भेट घेतली. भेटीमध्ये रिव्हर मार्चच्या सदस्यांनी कांदिवली येथील पोयसर नदीवर फ्लोटिंग आयलँड (तरंगते बेट)च्या प्रस्तावावर चर्चा केली. पोयसर नदीच्या प्रायोगिक प्रकल्पाबाबत आयुक्त अजय मेहता यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून,  महापालिकेचा पूर्ण पाठिंबा देण्याबाबत सहमती दर्शवली आहे. कांदिवली वॉर्डचे सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मदत करतील, अशी हमी सदस्यांना आयुक्तांकडून देण्यात आली.प्रायोगिक प्रकल्पासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर)च्या मदतीची गरज आहे. कारण सद्य:स्थितीला महापालिकेकडून प्रकल्पासाठी निधी जमवणे कठीण आहे. महापालिकेने पाठिंबा दिल्यावर हा प्रकल्प नदीच्या मोठ्या भागावर सुरू केला जाईल. मे २०१७ रोजी शुभजित मुखर्जी आणि रिव्हर मार्चच्या मार्गदर्शनाखाली पोयसर नदीमध्ये प्लॅस्टिकचे फ्लोटिंग आयलँड (तरंगते बेट) तयार करून नदीमध्ये सोडले होते. रिव्हर मार्चने या प्रकल्पाचा अभ्यास करून पाठपुरावा केला आणि आता अंमलात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अजय मेहता यांनी सदस्यांना सांगितले की, मुंबई महानगरात चार नद्या पुनर्जीवित करण्याची योजना तुम्ही आखत आहात. त्याचप्रमाणे मिठी नदीचीही योजना लवकरच अंमलात आणली पाहिजे. यावर रिव्हर मार्चच्या सदस्यांनी सकारात्मक कामाबाबत पाठिंबा दर्शविला. दरम्यान, बैठकीला शुभजित मुखर्जी, गोपाळ झवेरी, अविनाश कुबल, सागर वीरा, अशोकानंद जवलगावकर, दीप्ती शर्मा आणि प्रफुल चौधरी उपस्थित होते.फ्लोटिंग आयलँड म्हणजे ?फ्लोटिंग आयलँड हे एक तरंगते बेट असते. पाण्यावर तरंगणाºया ज्या वस्तू आहेत त्याचे तरंगते बेट तयार केले जाते. या बेटामध्ये छिद्र पाडून वेगवेगळ््या प्रकारची झाडे लावली जातात. मग हे तरंगते बेट कशाच्या तरी आधारावर नदीत सोडले जाते, अशी माहिती रिव्हर मार्चच्या सदस्यांकडून देण्यात आली.