मधुकर ठाकूर
उरण : भारतातील संपूर्ण किनारपट्टीवर जागतिक दर्जाचे तरंगते पायाभूत प्रकल्प जनतेसाठी उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने तरंगत्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार केला आहे. यावर जनतेकडून मार्गदर्शक सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर अशा तरंगत्या जेट्टींचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने अनेक ठिकाणी बांधकाम केले आहे. हे करताना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले आहे. यामध्ये गोव्यात प्रवासी तरंगत्या जेट्टी, साबरमती आणि सरदार सरोवर धरण येथील सी-प्लेनसाठीचे जलविमानतळ यांचा समावेश आहे. सध्या देशाच्या विविध किनारपट्टींवर अशा ८० प्रकल्पांची कामे सुरू असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.
कामासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक नियम बनविले आहेत. यासाठी मंत्रालयाने आयआयटी चेन्नईला, टिकावू तरंगते बांधकाम तयार करण्यासाठी तंत्रज्ञानविषयक निकष तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा त्याच्या तंत्रज्ञानविषयक गरजांच्या प्रस्तावित वैशिष्ट्ये आणि तपशिलांसह जनतेसाठी जारी करण्यात आला आहे. यावर जनतेकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. http://shipmin.gov.in/sites/default/files/proforma_guidelines. लिंकवर मार्गदर्शक सूचनांचा मसुदा पाहता येईल, सूचना, हरकती sagar.mala@nic.in. मेलआयडीवर पाठवायच्या आहेत. मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जारी करणे आणि त्यावर जनतेकडून सूचना, हरकती मागविणे हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. यामुळे किनारी भागात राहणाऱ्यांना दीर्घकालीन सुविधा मिळणे शक्य होईल.
फोटो आहे-१३ फ्लोटिंग वॉकवे