Join us

अखेरच्या रविवारी भाविकांचा ‘पूर’; पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक, मध्य व हार्बरवरील ब्लॉक रेल्वेकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 5:42 AM

गणेशोत्सव काळातील शेवटचा रविवार असल्यामुळे रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या गर्दीत वाढ होणार आहे. गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्याने भाविक मोठ्या संख्येने शहरातील नावाजलेल्या मंडळांना भेट देतील.

मुंबई : गणेशोत्सव काळातील शेवटचा रविवार असल्यामुळे रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या गर्दीत वाढ होणार आहे. गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्याने भाविक मोठ्या संख्येने शहरातील नावाजलेल्या मंडळांना भेट देतील. संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य आणि हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान ‘जम्बोब्लॉक’ घेण्यात येणार आहे.गणेशोत्सवातील शेवटचा रविवार असल्याने रविवारी पूर्ण दिवस भाविक शहरातील मोठ्या मंडळांना भेट देण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने बहुतांशी भाविकांनी प्रवास करणे टाळले. त्यामुळे शहरातील गर्दीचे उच्चांक मोडणारी गणेश मंडळे ‘भाविकांविना ओस’ पडल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्रीपासून महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे जत्थे परळ, करी रोड, चिंचपोकळी येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. परिणामी, गणेश उत्सवातील शेवटच्या सुट्टीच्या दिवशी यात भर पडणार आहे.भाविकांच्या गर्दीचा सर्वाधिक ताण रेल्वे सेवांवर पडणार आहे. हा ताण कमी करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर भाविकांच्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर विशेष लोकल फेºयादेखील चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.दरम्यान, शनिवारी टिटवाळा-कसारा लोकल सेवा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांकडून काही अंशी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सांताक्रुझ-गोरेगावदरम्यान धिम्या मार्गावर जम्बोब्लॉकपश्चिम रेल्वेमार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान १०.३५ ते ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, ब्लॉक कालावधीत वाहतूक जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विलेपार्ले स्थानकावर फलाट क्रमांक ५ आणि ६वर जलद मार्गावर सर्व लोकलला दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. राम मंदिर स्थानकावर या ट्रेन थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेºया रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली.‘बड्या’ मंडळांत होणार गर्दीमंगळवारी झालेल्या पावसामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली. रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने बुधवार आणि गुरुवारीदेखील रेल्वे सेवा सुरळीत होऊ शकली नाही. परिणामी, शुक्रवारी रात्रीपासून महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे जत्थे गणेश दर्शनासाठी येऊ लागले. रविवारी सुट्टी असल्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या संख्येने भाविक गणेश मंडळांकडे कूच करतील. त्यामुळे रविवारी लालबाग, परळ, करी रोड येथील मंडळांसह शहरातील ‘बड्या’ मंडळांत भाविकांचा ‘पूर’ येणार असल्याची माहिती लालबाग परिसरातील गणेश मंडळांतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिली.नाइट राइड इन ‘गणपती’...फिलिंग ‘सुसाट’मुंबईतील तरुणांना नाइट लाइफ नवीन नाही. गणेशोत्सवातील दहा दिवस म्हणजे अशा तरुणांचे हक्काचे दिवस मानले जातात. गणपती बघायला जातो, असे विचारल्याने सहसा घरच्यांकडून नकार मिळत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून नाइट आउटचे प्लॅन ‘फिक्स’ झाले आहेत. शनिवारी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुणांनी ‘नाइट राइड इन गणपती...फिलिंग सुसाट’ असे स्टेट्स अपडेट करत गणेशाचे दर्शन घेतले.

टॅग्स :मध्ये रेल्वेगणेशोत्सव