Flood : 'विमा कंपन्यांशी बोलणी सुरू, केंद्रानेही दुजाभाव न करत मदत द्यावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 02:48 PM2021-09-30T14:48:25+5:302021-09-30T14:48:53+5:30

Flood : बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला

Flood : 'Negotiations with insurance companies underway, Center should help without harm', ajit pawar on heavy rain of marathwada | Flood : 'विमा कंपन्यांशी बोलणी सुरू, केंद्रानेही दुजाभाव न करत मदत द्यावी'

Flood : 'विमा कंपन्यांशी बोलणी सुरू, केंद्रानेही दुजाभाव न करत मदत द्यावी'

googlenewsNext
ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई - राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानाचा अंदाज घेऊन केंद्राकडे मदतीची मागणी केली जाते. मात्र, किती मदत द्यायची हा निर्णय केंद्राचा आहे. काही राज्यांना केंद्राने न मागता हजारो कोटींचे पॅकेज दिले. केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे असल्याने कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव न करता मदत द्यायला हवी, असे म्हणत केंद्र सरकारकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीची मागणी केली आहे.   

बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. 

पीक विमा कंपन्याशी चर्चा सुरू

राज्य सरकार संपूर्ण माहिती गोळा करत आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफचे निकष पाहून मदत करण्याची आमची भूमिका आहे. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशासनाला योग्य ते निर्देश देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

माहिती मिळताच शेतकऱ्यांना दिलासा

अतिवृष्टीसोबतच काही भागात धरणांचे पाणी सोडल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक संकट आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्ग, लोकप्रतिनिधींकडून करण्यात येतात. राज्य सरकारकडे अनेकांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेय. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानाची निश्चित माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. 
 

Read in English

Web Title: Flood : 'Negotiations with insurance companies underway, Center should help without harm', ajit pawar on heavy rain of marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.